

IAS Tyagrajan And IAS Rahul Kumar
Esakal
बिहारमध्ये असलेल्या दोन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांना केंद्र सरकारने दिल्लीत मोठी जबाबदारी दिलीय. दोघांचीही पाच वर्षांसाठी दिल्लीत नियुक्ती करण्यात आलीय. आयएएस डॉक्टर त्यागराजन एस एम आणि राहुल कुमार अशी अधिकाऱ्यांची नावे आहेत. दोघेही २०११ च्या बॅचचे अधिकारी आहेत. डॉक्टर त्यागराजन यांची सहकार मंत्रालयात तर राहुल कुमार यांची अल्पसंख्याक कार्य मंत्रालयात संचालकपदी वर्णी लागली आहे.