

Dabur Products Ban fssai action
esakal
FSSAI Action Dabur : भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (एफएसएसएआय) डाबर इंडिया लिमिटेडविरोधात मोठी कारवाई केली आहे. दिशाभूल करणारे '100 टक्के' दावे करणाऱ्या अनेक खाद्यपदार्थांच्या विक्रीवर तात्काळ बंदी घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. '100 टक्के नैसर्गिक', '100 टक्के शुद्ध', '100 टक्के शुद्धतेची हमी', '100 टक्के सेंद्रिय' आणि '100 टक्के कोवळ्या नारळाचे पाणी' असे दावे ग्राहकांची दिशाभूल करणारे असल्याचे एफएसएसएआयने म्हटले आहे.