इंधन दरवाढ पुन्हा सुरू 

पीटीआय
शुक्रवार, 6 जुलै 2018

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात महिनाभराच्या कालावधीनंतर अखेर गुरुवारी वाढ करण्यात आली. आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचे वाढलेले भाव आणि रुपयातील घसरण यामुळे ही इंधन दरवाढ करण्यात आली आहे. 

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात महिनाभराच्या कालावधीनंतर अखेर गुरुवारी वाढ करण्यात आली. आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचे वाढलेले भाव आणि रुपयातील घसरण यामुळे ही इंधन दरवाढ करण्यात आली आहे. 

पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 16 पैसे आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 12 पैसे वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत आज पेट्रोलचा दर प्रतिलिटर 75.51 रुपये आणि डिझेलचा दर प्रतिलिटर 67.50 रुपये होता. मागील आठ दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नव्हता. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या तीन सरकारी तेल कंपन्यांनी 26 जूनपासून दरात बदल केलेले नव्हते. 

केंद्र सरकार सध्या पेट्रोलवर प्रतिलिटर 19.48 रुपये आणि डिझेलवर प्रतिलिटर 15.33 रुपये उत्पादन शुल्क आकारते. देशात मुंबईमध्ये पेट्रोलवरील मूल्यवर्धित कर (व्हॅट) सर्वाधिक असून, तो 39.12 टक्के आहे. देशात तेलंगणमध्ये डिझेलवरील व्हॅट सर्वाधिक असून, तो 26 टक्के आहे. अंदमान आणि निकोबार बेटांवर इंधनावर सर्वांत कमी व्हॅट असून, तो केवळ 6 टक्के आहे. 

Web Title: Fuel price increase agian