जी-20 कृती गटाची तिसरी बैठक वाराणसीत

यूएनआय
सोमवार, 27 मार्च 2017

जी-20 परिषदेच्या आराखडा कृती गटाची (एफडब्लूजी) तिसरी बैठक 28 आणि 29 मार्चला वाराणसी येथे होणार आहे. अर्थ मंत्रालय आणि रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया हे या बैठकीचे सहआयोजक आहेत. यापूर्वीच्या दोन बैठका बर्लिन (जर्मनी) आणि रियाध (सौदी अरेबिया) येथे झाल्या आहेत.

नवी दिल्ली - जी-20 परिषदेच्या आराखडा कृती गटाची (एफडब्लूजी) तिसरी बैठक 28 आणि 29 मार्चला वाराणसी येथे होणार आहे. अर्थ मंत्रालय आणि रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया हे या बैठकीचे सहआयोजक आहेत. यापूर्वीच्या दोन बैठका बर्लिन (जर्मनी) आणि रियाध (सौदी अरेबिया) येथे झाल्या आहेत.

वाराणसी येथील बैठकीमध्ये जागतिक पातळीवरील आर्थिक परिस्थितीबाबत आणि विकासादरम्यान येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाताना असलेल्या धोरणात्मक पर्यायांवर चर्चा अपेक्षित आहे. तसेच, जी-20 परिषदेचा अजेंडा निश्‍चित करणे आणि सर्व देशांना त्यांची विकासात्मक धोरणे राबविणे सोयीचे जावे यासाठी आराखडा निश्‍चित करणे ही देखील या बैठकीचे उद्दिष्टे आहेत. "एफडब्लूजी' हा जी-20 परिषदेचा प्रमुख कृती गट असून भारत आणि कॅनडा हे या गटाचे संयुक्त अध्यक्ष आहेत. भारताचा 2009 मध्ये या गटात समावेश झाल्यापासून भारतात होत असलेली ही चौथी बैठक आहे.

Web Title: G-20 action committee; third meeting in Varanasi