G-7 परिषद लांबणीवर ; भारतासहित रशिया, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया यांना अमेरिकेचे निमंत्रण 

वृत्तसंस्था
रविवार, 31 मे 2020

जगातील ताकतवर देशांचे सम्मेलन म्हणून ओळखली जाणारी G-7 ही परिषद सप्टेंबर पर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

वॉशिंग्टन : जगातील ताकतवर देशांचे सम्मेलन म्हणून ओळखली जाणारी G-7 ही परिषद सप्टेंबर पर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्रअध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी G-7 शिखर परिषद सप्टेंबर पर्यंत पुढे ढकलल्याची महत्वपूर्ण घोषणा काल शनिवारी केली. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांनी G-7  शिखर परिषदेसाठी रशिया, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया आणि भारत या चार देशांना आमंत्रित करणार असल्याचे देखील यावेळी म्हटले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

G-7 ही जगातील सर्वात प्रगत अशा देशांची संघटना आहे. यंदा या संघटनेची शिखर परिषद अमेरिकेत जून महिन्यात पार पडणार होती. नंतर व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून G-7 संघटनेतील देशांचे मुख्य प्रतिनिधी यांची  बैठक होणार होती. मात्र आता कोरोनाच्या साथीमुळे ही परिषद संयुक्त राष्ट्र संघाच्या सप्टेंबर मधील अधिवेशना अगोदर किंवा नंतर आयोजित करण्यात येणार असल्याचे, अमेरिकेचे राष्ट्रअध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले आहे. G-7 ही संघटना सर्वात जुनी असली तरी, आता ही संघटना संपूर्ण जगाचे प्रतिनिधित्व करण्यास अपुरे पडत असल्याची खंत डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी व्यक्त केली. आणि त्यामुळेच रशिया, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया आणि भारत या चार देशांना G-7 शिखर परिषदेसाठी निमंत्रण देणार असल्याचे म्हटले आहे.
-------
दिल्लीतील सर्वात मोठ्या कोविड रुग्णालयाचे संचालक कोरोना पॉझिटिव्ह
-------
...अखेर स्पेस एक्सचे रॉकेट अवकाशात झेपावले
-------
ती आमची चुकच : अमित शाहांची कबुली
--------
G-7 या संघटनेत अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, युके आणि कॅनडा या सात देशांचा समावेश आहे. यापूर्वी रशियाचा देखील यात समावेश होता. त्यावेळी ही संघटना G-8 म्हणून ओळखली जात होती. मात्र युक्रेनच्या घटनेनंतर रशियाची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आंतरराष्ट्रीय पातळीवरील आर्थिक तसेच व्यापारिक मुद्द्यांवर दरवर्षी या शिखर परिषदेत चर्चा करण्यात येते. यापूर्वी जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल यांनी जोपर्यंत कोरोना संपत नाही तोपर्यंत G-7 शिखर परिषदेत सहभागी होणार नसल्याचे म्हटले होते. मागील वर्षी G-7 शिखर परिषद फ्रान्स मध्ये आयोजित करण्यात आली होती. त्यावेळेस फ्रान्सने भारताला निमंत्रण दिले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: G-7 conference will delay US will invites Russia South Korea Australia including India