गंभीरला धमकी देणारे ई-मेल पाकिस्तानातून; तपासात मोठा खुलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gautam Gambhir

गंभीरला धमकी देणारे ई-मेल पाकिस्तानातून; तपासात मोठा खुलासा

sakal_logo
By
टीम ईसकाळ टीम

नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार गौतम गंभीर यांना जीवे मारण्याची धमकी देणारे ई-मेल पाकिस्तानमधून आल्याचे तपासात समोर आले आहे. दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी गुरुवारी ही माहिती दिली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गंभीर यांना ई-मेल पाठविणाऱ्या व्यक्तीचीदेखील ओळख पटली आहे. शाहिद हमीद नावाच्या अकाऊंटवरून हे ई-मेल पाठविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा: सिद्धूंनी आपल्या मुलांना भारत-पाक सीमेवर पाठवावं: गौतम गंभीर

गंभीर यांना पाठविण्यात आलेल्या पहिला ईमेलमध्ये "आम्ही तुला आणि तुझ्या कुटुंबाला मारून टाकू" असे लिहिले होते. त्यानंतर आलेल्या दुसऱ्या ईमेलमध्ये "आम्ही तुला मारण्याचा विचार केला होता, परंतु काल तू वाचलास." अशा आशयाचा मजकूर लिहिण्यात आला होता. दरम्यान, "तुम्हाला तुमचे कुटुंबीय प्रिय असेल तर राजकारण आणि काश्मीर प्रश्नापासून दूर राहा," असा इशारादेखील यामध्ये देण्यात आला होता. या घटनेनंतर गंभीर यांच्या निवास्थाबाहेरील सुरक्षा वाढविण्यात आली आहे.

याप्रकरणी गंभीर यांच्याकडून देण्यात आलेली तक्रार सायबर सेल आणि विशेष तपास पथकाकडे नोंदविण्यात आल्याची आहे, अशी माहिती दिल्ली पोलीस दलातील विरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. याप्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. गंभीर यांना देण्यात आलेली धमकी ISIS काश्मीरने दिल्याचे बोलले जात आहे.

loading image
go to top