सिद्धूंनी आपल्या मुलांना भारत-पाक सीमेवर पाठवावं - गौतम गंभीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Navjot Singh Sidhu Controversy
सिद्धूंनी आपल्या मुलांना भारत-पाक सीमेवर पाठवावं - गौतम गंभीर

सिद्धूंनी आपल्या मुलांना भारत-पाक सीमेवर पाठवावं: गौतम गंभीर

पंजाब काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) हे त्यांच्या पाकिस्तान प्रेमावरून यापूर्वी देखील टीकेचे धनी झाले आहेत. शनिवारी त्यांनी केलेल्या अशाच एका विधानामुळे ते पुन्हा अडचणीत आले असून, त्यांच्यावर आता मोठ्या प्रमाणात टीका होतेय. करतारपुर कॉरीडोअरला गेलेले नवज्योत सिंग सिद्धू यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्राण खान हे आपल्या मोठ्या भावासारखे असल्याचे म्हटले होते. त्यावर आता माजी क्रिकेटर आणि भाजप नेता गौतम गंभीरने जोरदार निशाणा साधला आहे.

हेही वाचा: 'आता मोदी सरकारने 'हे' देखील मान्य करावं' : राहुल गांधी

करतारपूर साहिब यात्रेसाठी पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेलेले पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्यामुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. इम्रानने माझ्यावर नेहमीच खूप प्रेम केल असून ते माझ्या मोठया भावासारखे असल्याचं सिद्धू यांनी म्हटलं आहे. सिद्धूच्या या वक्तव्यावर भाजपचे गौतम गंभीरने जरोदार टीका केलीये. देश स्वातंत्र्य झाल्यापासून पाकिस्तानकडून केल्या जाणाऱ्या अतिरेकी कारवायांना सामोरं जातोय, आणि अशा देशाच्या पंतप्रधानाला सिद्धू भाऊ असल्याचं सांगतात. ही गोष्ट लाजीरवानी असून, सिद्धू यांनी आपल्या मुलांना देशाच्या सीमेवर पाठवावं असंही गंभीरने म्हटलं आहे

हेही वाचा: राजस्थान: गेहलोत मंत्रिमंडळात पायलट समर्थकांना मिळणार स्थान?

नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पाकिस्तान प्रेमावरून त्यांच्यावर यापूर्वी देखील टीका झाली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधींवर देखील टीका होतेय. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि सिद्धू यांच्यात याच मुद्दयावरून वाद होत असत. त्यामुळे आगामी काळातील निवडणुकांमध्ये काँग्रेसला या मुद्यावरून टीकेचा सामना करावा लागू शकतो.

loading image
go to top