Delhi Elections : गांधी परिवाराने बजावला मतदानाचा हक्क

वृत्तसंस्था
Saturday, 8 February 2020

काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी, खासदार राहुल गांधी यांनीही मतदानाचा हक्क बजावला.

दिल्ली विधानसभा निवडणूक 2020 : नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणूकासाठी आज (ता. ८) मतदान होत आहे. दिल्लीतील ७० मतदारसंघांसाठी हे मतदान होईल. काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी, खासदार राहुल गांधी यांनीही मतदानाचा हक्क बजावला. दिल्लीतील निर्माण भवन येथील मतदान केंद्रावर सोनिया यांनी मतदान केले, तर प्रियांका यांनी लोधी इस्टेट येथे मतदान केसे. राहुल यांनी औरंगझेब लेन येथील मतदान केंद्रावर मतदान केले. 

Delhi Elections : ज्यांनी काम केलं त्यांनाच दिल्लीकर निवडून देतील : अरविंद केजरीवाल

 

'आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे. सर्वांनी मतदान केलेच पाहिजे. आळशीपणा न करता मतदान करा,' असे मतदान करून आल्यानंतर प्रियांका यांनी सांगितले.  गांधी परिवारासोबतच माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी पत्नी गुरूशरणसिंह यांच्यासह निर्माण भवन येथे मतदानाचा हक्क बजावला. 

Delhi Assembly Elections : दिल्लीकर आज कोणाला देणार कौल!

 

मगील विधानसभा निवडणूकीत काँग्रेसला दिल्लीत एकहा जागा मिळवता आली नव्हती. यावेळी काँग्रेसचे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रेसने यावेळी दिल्लीत जोरदार प्रचार केला आहे. सोनिया यांची तब्येत ठिक नसल्याने त्यांना फारसे प्रचारात उतरता आले नाही, पण प्रियांका व राहुल यांनी ही धुरा सांभाळली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gandhi Family casts vote at Delhi assembly elections