esakal | गांधी शांतता पुरस्कार - बांगलादेशचे बंगबंधू आणि ओमानच्या सुलतानांचा गौरव
sakal

बोलून बातमी शोधा

bangbandhu

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गांधी शांतता पुरस्काराच्या घोषणेनंतर ट्विट केलं आहे. भारतीय उपखंडातील महान नेत्यांपैकी एक बंगबंधु शेख मुजीबुर रहमान यांना गांधी शांतता पुरस्कार देण्यात आला आहे.

गांधी शांतता पुरस्कार - बांगलादेशचे बंगबंधू आणि ओमानच्या सुलतानांचा गौरव

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - भारताच्या सांस्कृतिक मंत्रालयाने सोमवारी गांधी शांतता पुरस्कारांची घोषणा केली. 2020 साठीच्या पुरस्कारासाठी बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांची तर 2019 च्या पुरस्कारासाठी ओमानचे दिवंगत सुल्तान काबूस बिन अल सैद यांच्या नावांची घोषणा करण्यात आली. भारत सरकारने 1995 मध्ये गांधी शांतता पुरस्काराची सुरुवात केली होती. महात्मा गांधींच्या 125 व्या जयंतीनिमित्त गांधी शांतता पुरस्कार भारत सरकारच्या वतीने देण्यास सुरुवात झाली होती. हा पुरस्कार नागरिकत्व, भाषा, जात, धर्म, लिंग या सगळ्याच्या पलिकडे आहे. गांधी शांतता पुरस्काराशी संबंधीत समितीचे अध्यक्षपद पंतप्रधानांकडे असते. तर मुख्य न्यायाधीश, लोकसभेतील सर्वात मोठ्या विरोधी पक्षाचा नेता हे दोघे पदसिद्ध सदस्य असतात. दोन्ही इतर सदस्य लोकसभा अध्यक्ष आणि सुलभ इंटरनॅशनल सोशल सर्विस ऑर्गनायझेशनचे संस्थाक बिंदेश्वर पाठक यांचाही समावेश आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गांधी शांतता पुरस्काराच्या घोषणेनंतर ट्विट केलं आहे. भारतीय उपखंडातील महान नेत्यांपैकी एक बंगबंधु शेख मुजीबुर रहमान यांना गांधी शांतता पुरस्कार देण्यात आला आहे. 2020 बंगबंधुंचे जन्मशताब्दी वर्ष आहे. ते त्यांच्या लाखो समर्थकांसाठी धाडसाचं आणि संघर्षाचं प्रतिक आहेत. 

गांधी शांतता पुरस्कारसाठी समितीची बैठक 19 मार्च 2021 ला झाली होती. यामध्ये शेख मुजीबुर रहमान आणि सुल्तान काबूस बिन अल सैद यांच्या नावांची पुरस्कारासाठी निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सुल्तान काबूस बिन अल सैद यांच्या योगदानासाठी 2019 चा गांधी शांतता पुरस्कार देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात ालं. या बैठकीतच बंगबंधु शेख मुजीबुर रहमान यांना 2020 चा गांधी पुरस्कार देण्याचाही निर्णय झाला. 

हे वाचा - ‘कॅच द रेन’ जनआंदोलन व्हावे - पंतप्रधान नरेंद्र मोदी

याआधी गांधी शांतता पुरस्कार टाझानियाचे माजी राष्ट्रपती डॉक्टर ज्युलियस न्येरे, जर्मनीचे डॉक्टर गेरहार्ड फिशर, रामकृष्ण मिशन, बाबा आमटे, दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्रपती नेल्सन मंडेला, दक्षिण आफ्रिकेचे आर्कबिश, डेसमंड टूटूट, चंडी प्रसाद भट्ट यांना देण्यात आला आहे. 2015 मध्ये विवेकानंद केंद्र, 2016 मध्ये अक्षय पात्र फाउंडेशन, भारत आणि सुलभ इंटरनॅशनल, 2017 मध्ये एकल अभियान ट्र्स्ट आणि 2018 मध्ये जपानच्या योही ससाकावा यांचा गौरव करण्यात आला होता.

loading image
go to top