esakal | ‘कॅच द रेन’ जनआंदोलन व्हावे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
sakal

बोलून बातमी शोधा

Narendra Modi

मनरेगा योजनेचा पैसा न पैसा हा पाणी वाचविण्यासाठी खर्च झाला पाहिजे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. जागतिक जलदिनानिमित्त जलशक्ती मंत्रालयातर्फे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

‘कॅच द रेन’ जनआंदोलन व्हावे - पंतप्रधान नरेंद्र मोदी

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - मनरेगा योजनेचा पैसा न पैसा हा पाणी वाचविण्यासाठी खर्च झाला पाहिजे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. जागतिक जलदिनानिमित्त जलशक्ती मंत्रालयातर्फे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. आगामी पावसाळ्यात पावसाचा प्रत्येक थेंब वाचविण्याच्या ‘कॅच द रेन'' या मोहिमेचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. ३० मार्च ते ३० नोव्हेंबर या काळात दरवर्षी ही मोहीम लोकआंदोलनाच्या स्वरूपात राबविली जाईल. जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान उपस्थित होते. बुंदेलखंड व दोन्ही राज्यांसाठी वरदान ठरणाऱ्या महत्वाकांक्षी केन बेतवा योजनेच्या करारावर यावेळी तिघांनीही स्वाक्षऱ्या केल्या. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मोदी म्हणाले, की पावसाळा सुरू व्हायला काही महिने शिल्लक आहेत. यामुळे पावसाचे पाणी वाचविण्यासाठी आतापासूनच तयारी केली पाहिजे. ही लोकचळवळ झाली पाहिजे यासाठी गावागावांत जनजागृती मोहिमा वेगवान कराव्या लागतील. पावसाआधी तलाव, पाणवठे, विहीरी यांच्या सफाईची, गाळ काढण्याची कामे पूर्ण झाली पाहिजे. पावसाच्या पाण्याच्या रस्त्यात काही अडथळे येत असतील तर ते वेळीच दूर करून या पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविला पाहिजे. यासाठी फार मोठ्या अभियांत्रिकी यंत्रणेची गरज नाही. 

नायब राज्यपालांना दिल्लीचे बॉस बनवणाऱ्या विधेयकाला लोकसभेत मंजुरी; केजरीवालांना झटका

‘मनरेगा’चा प्रत्येक पैसा याच कामासाठी वापरला पाहिजे. लोकांच्या मनावर पावसाचा प्रत्येक थेंब वाचविला पाहिजे, ही भावना तीव्रतेने जागृत झाली पाहिजे. 

"तू महाराष्ट्रात कशी फिरतेस तेच बघू"; शिवसेना खासदाराने धमकी दिल्याचा आरोप

मोदी म्हणाले ...

  • उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशातील पाण्याचा गंभीर प्रश्‍न मिटावा यासाठी अटलबिहारी वाजपेयी यांनी एक स्वप्न पाहिले होते. अटलजींच्या त्या स्वप्नाची पूर्तता केली जात आहे. जर कोरोनाचे संकट आले नसते व मी झॉंशी बुंदेलखंडात येऊन या योजनेचे उद्‌घाटन केले असते तर लाखो लोक उस्फूर्तपणे आले असते इतके हे महत्त्वाचे काम आहे. 
  • पाण्याची ताकद म्हणजे जलशक्ती याबाबतची जागरूकता वाढली ही आनंदाची बाब आहे. सारे जग पाणी दिवस साजरा करत आहे. आम्ही याबाबतही जगासमोर आदर्श ठेवला पाहिजे. 
  • भारतातील पाणी प्रश्‍नाचा तोडगा निघावा यासाठी इतर प्रयत्नांसह केन-बेतवा परियोजनेद्वारे मोठे पाऊल सरकारने उचलले आहे. 
  • जर लोकचळवळ उभी करून पाण्याचा प्रश्‍न दूर करण्याचा प्रयत्न केला तर ही अडचण वाटणार नाही किंबहुना पाण्याचे मूल्य अधिक कळू लागेल. 
  • दोन दशकांपूर्वीच हे काम व्हायला हवे  होते. पण तेव्हा ते केले नाही. 
  • भारत जसजसा विकासाच्या रस्त्यावर अग्रेसर होत आहे तसतसे पाण्याचे संकटही वाढत आहे. ते वेळीच दूर करायला हवे. पाणी वाचविण्यासाठी देशात पहिल्यांदाच केंद्र सराकरने इतका मोठा पुढाकार घेतला आहे. 
  • आम्हाला पुढच्या पिढ्यांच्या हाती पाणी व जलसाठे देऊन जायचे आहे. त्यासाठी सध्याच्या पिढीची जबाबदारी मोठी आहे. पर ड्रॉप, मोर क्रॉप, अटल जल योजना, नमामी गंगे यासारख्या योजनांवर मोठे काम सुरू आहे. पाण्याचे व्यवस्थापन जितके चांगले करू तितके आमचे भूजलावरील अवलंबित्व कमी होत जाईल. 
  • पाण्याच्या चाचण्या करण्याच्या मोहिमेत ग्रामीण महिलांनाही जोडले जात आहे. 
  • निवडणुका होणारी राज्ये वगळता इतर साऱ्या राज्यांत पाणी वाचवा मोहीम तातडीने सुरू करण्यात येणार आहे. 
  • जलसंरक्षणासाठी ग्रामसभांमध्ये जल शपथ ग्रहण कार्यक्रम घेतले जातील.

आता कोविशील्ड लशीचा दुसरा डोस ५६ दिवसानंतर

Edited By - Prashant Patil