आसाराम बापूला जामीन नाही: सर्वोच्च न्यायालय

वृत्तसंस्था
सोमवार, 22 जानेवारी 2018

नवी दिल्ली - गुजरातच्या गांधी नगर येथील बलात्कार प्रकरणी आसाराम बापू अटकेत असून, आज (सोमवार) झालेल्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने त्याला जामीन देण्यास स्पष्टपणे नकार दिला. बलात्कार पीडितेची साक्ष नोंदविल्या नंतरच जामीनावर विचार केला जाणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. 

आसाराम बापूच्या वकिलाने जामीनासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आसाराम बापूचे वय झाले असून आरोग्याच्या तक्रारी उदभवल्याचे कारण वकिलानी दिले. त्यामुळे बापूला जामीन द्यावा, अशी विनंती वकिलाने केली होती. मात्र न्यायालयाने त्यांची ही विनंती फेटाळली. 

आसारामच्या याचिकेवरील सुनावणी बोबत सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला फटकारले होते. पीडित मुलीची साक्ष अद्याप का नोंदविली नाही? असा सवालही न्यायालयाने केला होता. तसेच या प्रकरणाच्या प्रगतीचा अहवाल सादर करण्याचे आदेशही देण्यात आले होते.

Web Title: gandhinagar rape case supreme court said asaram bail hearing after victim statement