

Ganesh Chaturthi news:
sakal
उत्तरकाशी:
देशभर गणेशोत्सवाचा उत्साह असताना गणपती विसर्जनाची तयारी सुरू होते. मात्र, उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील डोडीताल परिसरात गणपती विसर्जनाची परंपरा नाही. यामागे या ठिकाणाशी जोडलेली पौराणिक श्रद्धा आहे. डोडीताल हे गणपतीचे जन्मस्थान मानले जाते. त्यामुळे स्थानिकांसाठी गणपती हे केवळ आराध्य दैवत नसून घरातीलच एक सदस्य आहेत. प्रेमाने त्यांना ‘डोडीराजा’ असे संबोधले जाते.