मोठी दुर्घटना! हरियाणात गणपती विसर्जनावेळी 7 जणांचा बुडून मृत्यू, 4 जणांना वाचवण्यात यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Haryana Ganesh Visarjan 2022

गणपतीच्या विसर्जनावेळी मोठी दुर्घटना घडलीय.

मोठी दुर्घटना! हरियाणात गणपती विसर्जनावेळी 7 जणांचा बुडून मृत्यू, 4 जणांना वाचवण्यात यश

चंदीगड : हरियाणात (Haryana) गणपतीच्या विसर्जनावेळी (Ganesh Visarjan 2022) मोठी दुर्घटना घडलीय. हरियाणात गणपतीचं विसर्जन करताना 7 जणांचा बुडून मृत्यू झालाय. सोनीपतमध्ये तीन जणांचा बुडून मृत्यू झाला, तर महेंद्रगडमध्ये चार जणांचा बुडून मृत्यू झालाय.

सोनपतमधील मिमारपूर घाटावर एक व्यक्ती आपला मुलगा आणि पुतण्यासोबत गणपतीच्या विसर्जनासाठी गेला होता. या लोकांचा बुडून मृत्यू झालाय. पोलिसांनी सांगितलं की, मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले असून या प्रकरणाचा तपास सुरूय. एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, महेंद्रगडमधील कनिना-रेवाडी मार्गावरील झगडोली गावाजवळील कालव्यावर गणेशमूर्तीचं विसर्जन करण्यासाठी गेलेले सुमारे नऊ जण पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेले. रात्री उशिरा आठ जणांना कालव्यातून बाहेर काढण्यात आलं. यामध्ये चौघांचा मृत्यू झाला.

हेही वाचा: Rajasthan : जीप-ट्रकच्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू

महेंद्रगड येथील झगडोली गावाजवळील गणेशमूर्ती विसर्जनासाठी सुमारे 20-22 जण कालव्यावर गेले होते. यादरम्यान अनेकांचा कालव्यात बुडून मृत्यू झाला. आतापर्यंत 4 मुलांना जीव गमवावा लागला असून 4 जणांना सुखरूप वाचवण्यात यश आलंय. याबाबत दु:ख व्यक्त करताना हरियाणाचे मुख्यमंत्री खट्टर म्हणाले, 'महेंद्रगड आणि सोनीपत जिल्ह्यात गणपती विसर्जनादरम्यान कालव्यात बुडून अनेक लोकांचा अकाली मृत्यू झाल्याची बातमी हृदयद्रावक आहे.' तर उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) गणपतीच्या विसर्जनाच्या वेळी झालेल्या एका दुःखद घटनेत दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला, तर उन्नावमधील रुग्णालयात एकाचा मृत्यू झाला. ही मुलं गंगा नदीत गणेशमूर्तींचं विसर्जन करण्यासाठी गेली होती.

हेही वाचा: Maharashtra Rain : महाराष्ट्रात आज पावसाचा 'यलो अलर्ट'; हवामान विभागाचा इशारा

Web Title: Ganesh Visarjan 2022 Haryana 7 Dead Other 4 Rescued During Ganesh Idol Immersions In Mahendragarh Jhagadoli Village

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..