

varanasi mumbai siddhivinaya
sakal
काशी : महादेवाची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काशीमध्ये गणेशोत्सवाची लगबग सुरू झाली आहे. यंदाच्या गणेशोत्सवात भाविकांना मुंबईतील प्रभादेवी येथील प्रसिद्ध सिद्धिविनायकाच्या रूपातील गणेशमूर्तीचे दर्शन घेता येणार आहे. शारदा भवन येथे आयोजित गणेशोत्सवात ही सुमारे १५ इंचांची मूर्ती सात दिवस विराजमान होणार आहे.
या मूर्तीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ती गंगेच्या मातीपासून साकारली जाते. गेल्या ४० वर्षांपासून एकाच मूर्तिकार कुटुंबाकडून शारदा भवनसाठी ही मूर्ती तयार केली जात आहे. मूर्तिकार कै. बद्री प्रसाद यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र अभिषेक प्रजापती यांनी हा वारसा पुढे नेला आहे. यंदाची सिद्धिविनायकाच्या रूपातील मूर्तीही त्यांनी स्वतः साकारली आहे.