
नको त्या अवस्थेत आढळले भाजपचे तीन नेते; काँग्रेसने शेअर केले फोटो
इंदोर : पोलिसांनी स्पा सेंटरवर छापा टाकला होता. यावेळी तब्बल १८ जणांना अटक करण्यात आली होती. अटक केलेल्या १८ जणांपैकी तिघे भाजप युवा मोर्चाचे नेते (BJP Leader) असल्याचे पुढे आले आहेत. पोलिसांनी त्यांना कारागृहात पाठवले. काँग्रेसने त्यांचे छायाचित्र प्रसिद्ध केले आहेत. तीनपैकी एक वनमंत्री विजय शहा यांच्या जवळचा असल्याचा आहे.
इंदोरमधील (indore) सलूनमध्ये देहव्यापाऱ्याचा टोळीचा पर्दाफाश (gang of prostitutes exposed) करताना आक्षेपार्ह स्थितीत सापडलेल्यांमध्ये खंडवा जिल्ह्यातील तीन भाजप युवा मोर्चाच्या नेत्यांचा समावेश असल्याचा आरोप प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते नरेंद्र सलुजा यांनी केला आहे. तिन्ही नेते खांडव्याचे वनमंत्री विजय शाह यांच्या जवळचे आहेत. तीन नेत्यांच्या अटकेने भाजपचा खरा चेहरा समोर आला आहे. आम्ही वनमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करतो, असे नरेंद्र सलुजा म्हणाले.
खंडवा जिल्हा भाजप तिघांची चौकशी करीत आहे. तिन्ही लोक भाजप युवा मोर्चाशी (BJP Leader) संबंधित असल्याचे आढळून आले आणि खंडणी प्रकरणात त्यांची काही भूमिका असेल तर राज्य भाजप त्यांना पक्षातून काढून टाकण्याची शिफारस करेल, असे राज्य भाजपचे प्रवक्ते उमेश शर्मा म्हणाले. मात्र, याप्रकरणी वनमंत्री शहा यांचे काँग्रेसच्या आरोपांना उत्तर मिळू शकले नाही.
हेही वाचा: माँ जिजाऊंच्या राजवाड्यासमोर उभारला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा
थायलंडमधील सात महिलांचा समावेश
विजयनगर, इंदोर येथील सलूनमध्ये लैंगिक संबंध ठेवल्याप्रकरणी (gang of prostitutes exposed) दहा महिला आणि आठ पुरुषांना अटक करण्यात आली. त्यात थायलंडमधील सात महिलांचा समावेश आहे. यातील तीन आरोपी खंडवा जिल्ह्यातील होते. त्यांना सलूनमधून ग्राहक म्हणून पकडण्यात आले होते, असे उच्च पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. सलूनच्या वेगवेगळ्या खोलीत ग्राहकांसह मुली होत्या. पोलिसांना चौकशीदरम्यान सलून चालकाने वेश्याव्यवसायाची कबुली दिली, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
Web Title: Gang Of Prostitutes Exposed Indore Madhya Pradesh Bjp Leader Congress Photos Share
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..