Crime News: धक्कादायक! अल्पवयीन बहिणीवर भावांनीच केला सामूहिक अत्याचार, टेरेसवरुन दिलं फेकून अन्..

Crime News: पीडितेवर सामूहिक अत्याचार केल्यानंतर आरोपींनी तिला दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकले, त्यामुळे ती गंभीर जखमी झाली. पीडितेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Crime News
Crime NewsEsakal

Crime News: बंदायू येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बंदायू जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. कुटुंबीयांनी पीडितेला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. कुटुंबीयांचा आरोप आहे की, पीडितेवर सामूहिक अत्याचार केल्यानंतर आरोपींनी तिला दुसऱ्या मजल्यावरून खाली ढकलून दिले, त्यामुळे ती गंभीर जखमी झाली. पीडितेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. जिल्ह्यातील आलापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 15 वर्षीय मुलीवर दोन भावांनी सामूहिक अत्याचार केला आणि नंतर तिला इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून ढकलून दिले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Crime News
Jalgaon Crime News : उटखेड्यात जुगारअड्ड्यावर छापा; 9 संशयितांविरुद्ध गुन्हे दाखल

दुसऱ्या मजल्यावरून ढकलले खाली

पिडीत अल्पवयीन मुलीला तिच्यावर अत्याचार करून दुसऱ्या मजल्यावरून खाली ढकलून देण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या या अल्पवयीन मुलीला उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी या घटनेसंदर्भात एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे. अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शेजारी राहणारे राजीव आणि आशिष हे दोन भाऊ तिला मंगळवारी रात्री त्यांच्या घरी घेऊन गेले होते.

Crime News
Jalgaon Cyber Crime : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने महिलेला गंडा! 10 लाख लंपास; मुंबईतून ठगबाजास अटक

गुन्हा दाखल करून सुरू केला तपास

दोन्ही भावांनी अल्पवयीन मुलीला टेरेसवर नेऊन सामूहिक अत्याचार केला. त्यानंतर त्यांनी अल्पवयीन मुलाला त्यांच्या घराच्या टेरेसवर नेले आणि तेथून तिला खाली ढकलून दिले. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी सामूहिक बलात्काराचा एफआयआर (३७६डी आयपीसी) नोंदवून तपास सुरू केला आहे.

Crime News
Jalgaon Cyber Crime : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने महिलेला गंडा! 10 लाख लंपास; मुंबईतून ठगबाजास अटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com