'मुझे छोड दो भैया' म्हणूनही ते नराधम थांबले नाहीत

वृत्तसंस्था
Tuesday, 17 September 2019

दिल्लीतील सराय काले खाँ भागात एका तरुणीवर चार जणांनी सामुहिक बलात्कार केला. एका 22 वर्षाच्या तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बागेमध्ये फिरायला आलेल्या तरुणीवर 4 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

नवी दिल्ली : मुझे छोड़ दो भैया...मुझे छोड़ दो अशी विनवणी करूनही त्या चार नराधमांनी तरुणीवर सामुहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना दिल्लीत घडली आहे.

मी पस्तावतोय बॅनरने कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांचे स्वागत

दिल्लीतील सराय काले खाँ भागात एका तरुणीवर चार जणांनी सामुहिक बलात्कार केला. एका 22 वर्षाच्या तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बागेमध्ये फिरायला आलेल्या तरुणीवर 4 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. सध्या पीडित तरुणी रुग्णालयात उपचार घेत असून तिची स्थिती अतिशय नाजूक आहे.

HappyBirthdayPM : मोदी भक्ताकडून सोन्याचा मुकूट अर्पण

या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पीडितेला शुद्ध आल्यानंतर ती सारखी बडबडत आहे. तिला मोठा मानसिक धक्का बसला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सराय काले खां बस स्थानकाजवळील इंद्रप्रस्थ पार्कमध्ये हा प्रकार घडला आहे. अत्याचार होत असताना तरुणीने प्रचंड आरडाओरड केली. 'मुझे छोड दो भैय्या' अशा अनेक विनवण्या केल्या पण तिचं कोणीही ऐकलं नाही किंवा कोणीही मदत केली नाही. ती शुद्धीत आल्यानंतरही अशीच बडबडत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gang rape of a woman in Delhi at indraprastha-park