HappyBirthdayPM : मोदी भक्ताकडून सोन्याचा मुकूट अर्पण

वृत्तसंस्था
Tuesday, 17 September 2019

मोदींवर आज देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. भाजप कार्यकर्त्यांकडून विविध प्रकारे त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे. मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीत त्यांच्या एका चाहत्याने संकटमोचन मंदिरात सोन्याचा मुकूट अर्पण केला आहे. 

वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 69 वा वाढदिवस देशभर उत्साहात साजरा होत असताना, वाराणसीत एका मोदी भक्ताकडून मंदिरात सोन्याचा मुकूट अर्पण करण्यात आला आहे.

HappyBirthdayPM : मोदींवर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव
मोदींवर आज देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. भाजप कार्यकर्त्यांकडून विविध प्रकारे त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे. मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीत त्यांच्या एका चाहत्याने संकटमोचन मंदिरात सोन्याचा मुकूट अर्पण केला आहे. 

उदयनराजेंना उगीच घेतले का ? मुख्यमंत्री
मोदींचे समर्थक असलेल्या अरविंदसिंह यांनी वाराणसीतील संकटमोचन हनुमान मंदिरात केंद्रात पुन्हा मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार यावे, यासाठी नवस बोलला होता. त्यानुसार त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त नवस पूर्ण करत, तब्बल 1.25 किलो वजनाचा सोन्याचा मुकूट मंदिरात अर्पण केला आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Narendra Modi birthday Varanasi sankat mochan temple lord Hanuman gold crown