वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान सामूहिक बलात्कार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

नवी दिल्ली- पश्चिम दिल्लीतील उत्तम नगर येथे वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान वर्गातील दोन मित्रांनी बलात्कार केल्याची घटना घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (शुक्रवार) दिली.

सोळा वर्षांच्या पीडित विद्यार्थीनीने तक्रारीत म्हटले आहे की, 'वाढदिवसाच्या पार्टीनिमित्त वर्गातील एका विद्यार्थ्याला आमंत्रित केले होते. पार्टीदरम्यान त्याने अन्य एका मित्राला बोलवून घेतले. दोघांनी मिळून बळजबरीने दारू पाजली. बेशुद्ध पडल्यानंतर दोघांनी बाजूला नेऊन सामूहिक बलात्कार केला.'

पीडित मुलीने दिलेल्या माहितीवरून बुधवारी (ता. 14) रात्री तक्रार दाखल करून घेण्यात आली आहे. मुलीची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून, याबाबत पुढील तपास सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.

Web Title: gang-raped by classmates at birthday party