धक्कादायक ! उन्नाव सामूहिक बलात्कार पीडितेला जाळले जिवंत

वृत्तसेवा
Thursday, 5 December 2019

उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे सामूहिक बलात्कार पीडितेला मारहाण करत जिवंत जाळण्यात आले आहे. महिलेने ज्या पाच जणांवर बलात्काराचा आरोप केला आहे, त्यांनीच महिलेवर हल्ला करत हे धक्कादायक कृत्य केलं आहे.

उन्नाव : उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे सामूहिक बलात्कार पीडितेला मारहाण करत जिवंत जाळण्यात आले आहे. महिलेने ज्या पाच जणांवर बलात्काराचा आरोप केला आहे, त्यांनीच महिलेवर हल्ला करत हे धक्कादायक कृत्य केलं आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, एकूण सहा जणांनी मिळून हल्ला केला. यावेळी तिच्या डोक्यावर आणि गळ्यावर चाकूने वार करण्यात आले. पीडित महिला जमिनीवर पडली असता तिच्यावर केरोसिन टाकून जाळण्यात आलं. यावेळी काही जणांनी पीडितेची मदत करण्यासाठी धाव घेतली. मात्र आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला असल्याचे सांगण्यात आले आहे.

साखर निर्यातीला मुख्य अडथळा कशाचा?

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ट्रेन पकडण्यासाठी रेल्वे स्टेशनला जात असताना रस्त्यात आरोपींनी तिला थांबवलं आणि मारहाण केली आणि भोसकलं. तसंच जिवंत जाळलं आणि पळ काढला. पीडित महिला ८० टक्के भाजली असून उन्नाव येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. नंतर कानपूर येथील एलएलआर रुग्णालयात हलवण्यात आलं.

भारत आता मुस्लिमांचा देश राहिला नाही

पीडितेने ज्या पाच जणांची नावं सांगितली होती त्यापैकी चौघांना अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी शिवम त्रिवेदी अद्याप फरार आहे. आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांची पथकं तयार करण्यात आली आहेत अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. पीडितेने रुग्णालयात पोलिसांना जबाब दिला आहे.

देशभरातून या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात येत असून अनेकांनी याविरुद्ध संताप व्यक्त केला आहे. शरद पवार यांनीही वेळीच योग्य ती कारवाई केली असती तर ही घटनाच घडली नसती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: UP gangrape survivor on way to court set afire by 5 including man who raped her