Salman Tyagi Death : दिल्लीतील कुख्यात गँगस्टर सलमान त्यागी याचा मृतदेह मंडोली तुरुंगात संशयास्पद अवस्थेत आढळला आहे. तुरुंग (Mandoli Jail) क्रमांक १५ मधील कोठडीत तो चादरीला लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. प्राथमिक तपासात आत्महत्येचा अंदाज व्यक्त केला जात असला, तरी या मृत्यूमागे काहीतरी वेगळे कारण आहे का, याची चौकशी सुरू आहे.