Mukhtar Ansari Death: पोलिस अलर्ट मोडवर! संपूर्ण उत्तर प्रदेशमध्ये कलम 144 लागू, काय आहे कारण?

Mukhtar Ansari Death: मुख्तार अन्सारीच्या मृत्यूनंतर त्याच्या गाझीपूर येथील घराजवळ लोक जमा होऊ लागले आहेत. शांतता आणि सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर पोलिस अल्रट मोडवर आले असून उत्तर प्रदेशमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे.
Mukhtar Ansari Death
Mukhtar Ansari DeathEsakal

Mukhtar Ansari Death: मुख्तार अन्सारीच्या मृत्यूनंतर त्याच्या गाझीपूर येथील घराजवळ लोक जमा होऊ लागले आहेत. शांतता आणि सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर पोलिस अल्रट मोडवर आले असून उत्तर प्रदेशमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे.

तुरुंगात असलेला उत्तर प्रदेशातील कुख्यात गँगस्टर आणि राजकीय नेता मुख्तार अन्सारी याच तीव्र हृदविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला आहे. छातीत वेदना होऊ लागल्यानं तातडीनं त्याला बांदा येथील सरकारी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. मात्र, रुग्णालयात दाखल केल्यानंतर लगेचच त्याचा मृत्यू झाला. समाजवादी पार्टीनं ट्विट करत अन्सारीच्या मृत्यूचं वृत्त दिलं आहे.

Mukhtar Ansari Death
Mukhtar Ansari Dies: तुरुंगात असलेला गँगस्टर मुख्तार अन्सारीचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू!

मुख्तार अन्सारीच्या मृत्यूमुळे, यूपीमध्ये कुठेही कायदा आणि सुव्यवस्थेशी संबंधित समस्या उद्भवू नयेत यासाठी यूपी पोलीस सतर्क झाले आहेत. मुख्तार अन्सारीच्या मृत्यूनंतर यूपी पोलिसांनी संपूर्ण उत्तर प्रदेशात कलम 144 लागू केले आहे. मुख्तार अन्सारीचा गुरुवारी संध्याकाळी मृत्यू झाला. बांदा, मऊ, गाझीपूर आणि वाराणसी या जिल्ह्यांमध्ये पोलिसांची पथके गस्त घालत आहेत.

उत्तर प्रदेश पोलिस सोशल मीडिया सेल ऑनलाइन माध्यमांवर लक्ष ठेवून आहे. मुख्तारच्या मृत्यूनंतर लगेचच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानी कायदा आणि सुव्यवस्थेबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.

Mukhtar Ansari Death
Kangana Ranaut : कंगना रणावत यांच्यावरील टिपण्णी भोवली, पक्षाने कापलं तिकीट...

उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक प्रशांत कुमार म्हणाले की, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी संपूर्ण राज्यात कलम 144 लागू करण्यात आले आहे. आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. बांदा, मऊ, गाझीपूर आणि वाराणसीमध्ये स्थानिक पोलिसांसह केंद्रीय पोलिस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

मुख्तार अन्सारीच्या घरी जमली गर्दी

उत्तर प्रदेश, पंजाब, नवी दिल्ली आणि इतर अनेक राज्यांमध्ये मऊमधून अनेक वेळा आमदार राहिलेल्या मुख्तार अन्सारी याच्याविरुद्ध सुमारे ६० खटले प्रलंबित आहेत. त्यांच्या मृत्यूची बातमी वृत्तवाहिन्यांवर पसरताच गाझीपूरमध्ये उपस्थित अन्सारी कुटुंबातील हितचिंतकांची गर्दी त्यांच्या घराबाहेर जमू लागली. मुख्तारच्या घराबाहेर जमाव त्याच्या समर्थनार्थ घोषणा देत होता. दरम्यान, पोलीस, प्रशासन आणि मुख्तार कुटुंबीयांनी लोकांना कायदा व सुव्यवस्थेचे पालन करण्याचे आणि गर्दी न करण्याचे आवाहन केले.

Mukhtar Ansari Death
PM Narendra Modi : ''धमकावणे, घाबरवणे, ही काँग्रेसची जुनी संस्कृती'' सहाशे वकिलांच्या पत्राचा संदर्भ देत पंतप्रधानांची टीका

समाजवादी पक्षाने व्यक्त केला शोक

समाजवादी पक्षाने मुख्तार अन्सारी यांच्या निधनाबद्दल एक्स वर पोस्ट करून शोक व्यक्त केला आहे. समाजवादी पक्षाने पोस्ट केली आहे, "मुख्तार अन्सारी यांच्या आत्म्याला शांती लाभो. शोकाकुल कुटुंबीयांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती मिळो. विनम्र श्रद्धांजली!"

Mukhtar Ansari Death
Sanjeev Bhatt: माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांना का झाला 20 वर्षांचा तुरुंगवास? वाचा संपूर्ण प्रकरण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com