'आम्हाला एक कोटीची नुकसानभरपाई का नाही?'

वृत्तसंस्था
शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - आम आदमी पक्षाच्या रॅलीदरम्यान आत्महत्या करणाऱ्या गजेंद्रसिंह यांच्या कुटुंबियांनी दिल्ली सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्‍न उपस्थित केले असून नुकसान भरपाई देताना दुटप्पी भूमिका घेतली जात असल्याचा आरोप केला आहे. 'वन रॅंक वन पेन्शन'साठी आंदोलन करताना आत्महत्या केलेल्या माजी सैनिकाच्या कुटुंबियांना एक कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्याच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर गजेंद्रसिंह यांच्या कुटुंबियांनी 'आम्हाला एक कोटीची नुकसान भरपाई का नाही?' असा प्रश्‍न उपस्थित केला आहे.

आम आदमी पक्षाची एप्रिल 2015 मध्ये दिल्लीतील जंतर-मंतर येथे शेतकऱ्यांसाठी सभा झाली होती. यावेळी गजेंद्रसिंह या शेतकऱ्याने झाडाला दोरी लावून फाशी घेतली. केंद्र सरकारच्या भूमि अधिग्रहण कायद्याला विरोध करणाऱ्या गजेंद्रने आत्महत्या करण्यापूर्वी तशी धमकीही दिली होती. मात्र त्याची दखल घेतली नाही.

वन रॅंक वन पेन्शनसाठी आंदोलन करणाऱ्या माजी सैनिकांनी आत्महत्या केल्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील दिल्ली सरकारने त्या सैनिकाच्या कुटुंबियांना एक कोटी रुपयांची नुकसान भरपाई देणार असल्याचे जाहीर केले  आहे. याबाबत बोलताना गजेंद्रसिंहचे लहान भाऊ देवेंद्रसिंह म्हणाले की, "दिल्ली सरकारने आत्महत्या करणारे माजी सैनिक रामकिशन ग्रेवाल यांच्या कुटुंबियांना एक कोटी रुपयांची मदत केली आहे. सरकारची ही वागणूक दुटप्पी वागणूक आहे' अशी टीका केली आहे. तसेच या संदर्भात दिल्ली सरकारसोबत चर्चा करण्यासाठी वेळही मागितल्याचेही सांगितले.

Web Title: Ganjendra Singh family questions Kejriwal government on compensation amount