‘उसाची गोडीकी जिना यांच्या समर्थकांची खोडी’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

yogi adityanath

‘उसाची गोडीकी जिना यांच्या समर्थकांची खोडी’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नोएडा : उसाची गोडी वाढणार की पाकिस्तानचे संस्थापक महंमद अली जिना यांचे समर्थक राज्यात खोडी काढणार हे देशाने ठरवावे, अशा शब्दांत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधी पक्षांवर तोफ डागली.

हेही वाचा: आता विभाजीत भारताला अखंडित बनवायला हवं - मोहन भागवत

जेवार विमानतळाच्या भूमीपूजन समारंभात त्यांनी विमानतळासाठी जमीन दिलेल्या सात हजारहून जास्त शेतकऱ्यांचे आभार मानले. ते म्हणाले की, राज्याच्या पश्चिम भागातील ऊसपट्ट्यात दंगली घडवून कटुता निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला. त्यामुळे आता हे ठरविण्याची वेळ आली आहे.

हेही वाचा: बापरे! भारत-पाक सामना एवढ्या लोकांनी पाहिला; Viewership चा नवा विक्रम

समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी अलीकडेच महंमद अली जिना यांचे स्वातंत्र्य लढ्यातील स्थान महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू यांच्या जोडीला असल्याचे मत व्यक्त केले होते. त्यावर भाजपने तीव्र टीका केली होती.

loading image
go to top