'गरीब रथ एक्स्प्रेस'चे तिकीट महागणार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जुलै 2018

नवी दिल्ली : मध्यमवर्गीयांना एसीचा प्रवास बजेटमध्ये बसवणाऱ्या 'गरीब रथ एक्स्प्रेस' गाड्यांच्या तिकीट दरात वाढ होणार आहे. यामुळे प्रवाशांच्या आनंदात अंजन पडणार असून, रेल्वेत देण्यात येणाऱ्या बेडरोलचे शुल्क तिकीटात समाविष्ट करण्यात येणार असल्याने ही दरवाढ होणार आहे. सध्या मिळाणाऱ्या बेडरोल मध्ये दोन चादरी, एक टॉवेल, एक उशी, एक ब्लँकेट याचा समावेश असतो.

बारा वर्षापुर्वी म्हणजे 2006 मध्ये प्रत्येक बेडरोलसाठी 25 रुपये शुल्क आकारण्यात येत होते. परंतु, मागील बारा वर्षापासून यामध्ये कोणत्याही प्रकारची दरवाढ न झाल्याने डेप्युटी कॉम्प्ट्रोलर अॅन्ड ऑडिटर (कॅग) ने रेल्वे प्रशासनाला सुनावले. यामुळे पुढील सहा महिन्यात रेल्वेच्या तिकीट दरात वाढ होणार आहे. 

गरीब रथ व दुरान्तो एक्स्प्रेस या गाडांच्या तिकिटांमध्ये बेडरोलच्या शुल्काचा समावेश नसतो. परंतु, बेडरोलच्या देखभालीचा खर्च मागील काही वर्षापासून वाढलेला आहे. तरिही रेल्वे प्रशासनाने त्याच्या शुल्कात वाढ केली नव्हती. कॅग च्या कार्यालयाने विचारणा केल्यामुळे तिकीट दरात वाढ होणार आहे.

कॅगने म्हटले आहे
बेडरोल किटची धुलार्ई, त्यांच्या वितरणासाठी नेमलेल्या कर्मचारीवर्ग, हे किट ठेवण्यासाठी रेल्वेगाडीत लागणाऱ्या जागेपोटी येणारा तसेच देखभालीचा खर्च वाढला आहे. त्यामुळे बेडरोलच्या शुल्काचा फेरआढावा घेऊन त्यात वाढ करणे आवश्यक आहे.

Web Title: 'Garib Rath Express' tickets rate will be increase