Gautam Adani : हिंडनबर्ग प्रकरणात चौकशी समिती गठीत होणार; सुप्रीम कोर्टामध्ये आज काय घडलं? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Adani Hindenburg Row

Gautam Adani : हिंडनबर्ग प्रकरणात चौकशी समिती गठीत होणार; सुप्रीम कोर्टामध्ये आज काय घडलं?

नवी दिल्लीः अदानी-हिंडनबर्ग प्रकरणामध्ये आज पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये CJI चंद्रचूड, न्यायाधीश नरसिम्हा आणि न्यायाधीश जेबी पारदीवाला यांच्या बेंचसमोर सुनावणी झाली. सरकारच्या वतीने महाधिवक्ता तुषार मेहता यांनी बाजू मांडली.

महाधिवक्ता तुषार मेहता यांनी सांगितलं की, हिंडनबर्ग प्रकरणात कोर्टाला तज्ज्ञ लोकांची समिती गठित करायची असेल तर सरकारला काहीही अडचण नाही. अदानी ग्रुप कंपनींच्या संबंधी हिंडनबर्गच्या रिपोर्ट प्रकरणात सरकार समिती गठित करण्यासाठी तयार असल्याचं स्पष्ट होत आहे.

हेही वाचाः अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

याप्रकरणी बुधवारी बंद पाकिटात समिती सदस्यांची नावं सरकारकडून कोर्टाला देण्यात येणार आहेत. पुढची सुनावणी शुक्रवारी होईल. सरकारने कोर्टाला कागपत्रांबाबतची गोपनियता ठेवण्याबाबत विनंती केली आहे.

सुप्रीम कोर्टाने महाधिवक्ता मेहता यांना सांगितलं की, समिती गठित करण्यासाठी प्रस्तावित नावांची यादी सीलबंद पाकिटातून जमा करुन घेण्यात येईल.

अदानी समूहाचे शेअर्स पुन्हा घसरले

अदानी समूहाच्या समभागांवर नजर टाकली तर, अदानी एंटरप्रायझेसचा स्टॉक 8 टक्क्यांनी घसरला आहे आणि तो रु. 1702 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. अदानी ग्रीन 5% घसरून 688 रुपयांवर, अदानी विल्मर 5% घसरून 414 रुपयांवर, अदानी ट्रान्समिशन 5% घसरून 1127 रुपयांवर, अदानी पॉवर 5% घसरून156 रुपयांवर, अदानी टोटल गॅस 5% घसरून 1192 रुपयांवर गेला. तर अदानी पोर्ट्स 7% घसरून 543 रुपयांवर, ACC 4.20 टक्क्यांनी घसरून 1801 रुपयांवर, अंबुजा सिमेंट 6.35 टक्क्यांनी घसरून 338 रुपयांवर आणि NDTV 5 टक्क्यांनी घसरून 198 रुपयांवर आला.