Gautam Adani launches Vande Bharatam initiative
esakal
अहमदाबाद : देशभरातील नवोन्मेषक, उद्योजक आणि समस्या सोडवणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना पाठिंबा देणे यासाठी अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी ‘वंदे भारतम्’ हा देशव्यापी उपक्रम सुरू केला (Adani innovation challenge for startups) आहे. त्यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी (ता.२५) येथे या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. यासाठी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली असून, सर्व वयोगटातील आणि विविध पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींसाठी हा उपक्रम खुला आहे.