esakal | हे दिल्लीकरांसाठी 'डेथ वॉरंट'सारखे; लॉकडाउन शिथीलतेवर 'गंभीर' प्रतिक्रिया

बोलून बातमी शोधा

 gautam gambhir, lockdown, delhi government

एकाच वेळी सर्व क्षेत्र खुली करण्यास परवानगी देणे हे दिल्लीकरांसाठी डेथ वॉरंट सारख आहे. मी सरकारला आवाहन करतो की, यावर पुन्हा एकदा विचार करुन लॉकडाउन शिथीलतेबाबत योग्य ती खबरदारी घेऊन निर्णय घ्यावा.

हे दिल्लीकरांसाठी 'डेथ वॉरंट'सारखे; लॉकडाउन शिथीलतेवर 'गंभीर' प्रतिक्रिया
sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा वाढत्या रुग्णांसह  देशव्यापी लॉकडाउनचा काउट डाउनही टप्प्याटप्याने वाढताना दिसत आहे. तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाउनचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर नव्या स्वरुपात 31 मेपर्यंत  चौथ्या टप्यातील लॉकडाउन कायम राहणार असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. चौथ्या टप्प्यातील लॉकडाउननंतर दिल्ली सरकारने अनेक क्षेत्रात सूट दिली आहे. शॉपिंग मॉलसर सर्व औद्योगिक क्षेत्र आणि वाहतूक सेवा खुली करण्याचा निर्णय दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घेतला आहे. 

युरोपीयन राष्ट्र कोरोनामुक्त! हा आहे लॉकडाउन हटवणारा जगातील पहिला देश

दिल्ली सरकारच्या या निर्णयावर भाजपचे विद्यमान खासदार आणि माजी क्रिकेटर गौतम गंभीर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दिल्ली सरकारने लॉकडाउनमध्ये दिलेली सूट ही दिल्लीकरांसाठी डेथ वॉरंट ठरेल, अशा शब्दांत गंभीर यांनी आपले मत व्यक्त केले.  सरकारने शिथीलतेबाबत फेरविचार करावा, असेही त्यांनी सूचवले आहे. गंभीर म्हणाले की, एकाच वेळी सर्व क्षेत्र खुली करण्यास परवानगी देणे हे दिल्लीकरांसाठी डेथ वॉरंट सारख आहे. मी सरकारला आवाहन करतो की, यावर पुन्हा एकदा विचार करुन लॉकडाउन शिथीलतेबाबत योग्य ती खबरदारी घेऊन निर्णय घ्यावा. एका चुकीमुळे आतापर्यंतची संपूर्ण मेहनत वाया जाईल, अशी भीतीही गंभीर यांनी व्यक्त केली आहे.   

या देशाचा एकुण रुग्णांच्या संख्येत आता जगामध्ये पाचवा क्रमांक

दिल्ली सरकारने सरकारी आणि खासगी कार्यालचे खुली करण्यास परवानगी दिली आहे. यासंदर्भात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जनतेशी संवाद साधला.  ते म्हणाले की, कोरोना विषाणूच्या विळख्यातून आपली तात्काळ सुटका होणार नाही. आतापर्यंतच्या लॉकडाउनमधून आपण हा लढा लढण्याची संपूर्ण तयारी केली आहे. आता आपल्याला अर्थव्यवस्थेकडेही पाहायला हवे. अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी एकाच वेळी सर्व क्षेत्र खुली करणे योग्य राहणार नाही. टप्प्याटप्याने आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करु.  

संसर्ग रोखण्यासाठी रसायनांची फवारणी केली, पण... 

दिल्लीमध्ये ऑटो रिक्षा, सायकल रिक्शामध्ये केवळ एक व्यक्ती बसण्यास परवानगी देण्यात आली आहे. दुचाकीवरुनही केवळ एकच व्यक्ती प्रवास करु शकते. दिल्लीमध्ये बससेवा देखील सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु बसमध्ये 20 पेक्षा अधिक प्रवासी घेण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. प्रवासादरम्यान सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन व्हायलाच हवे, असे आदेशही राज्य सरकारने दिले आहेत. मार्केट, शॉपिंग मॉल्स, दुकानें ऑड-ईव्हन पद्धतीने खुली करण्यास परवानगी देण्यात आली आहे, असेही अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केले होते.