Mud Volcano
sakal
देश
Mud Volcano: अंदमानमधील चिखलाचा ज्वालामुखी सक्रिय; भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग पाठवणार संशोधन पथक
Andaman Nicobar: अंदमानमधील बारातांग बेटावर दोन दशकांनंतर चिखलाच्या ज्वालामुखीचा उद्रेक झाला असून, या घटनेचा अभ्यास करण्यासाठी जीएसआयचे पथक घटनास्थळी रवाना होत आहे. भूगर्भातील हालचाली आणि वायूंचे नमुने तपासून कारणमीमांसा करण्यात येणार आहे.
पोर्ट ब्लेअर : देशातील एकमेव चिखलाच्या ज्वालामुखीच्या उद्रेकाची कारणमीमांसा करण्यासाठी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग (जीएसआय) अंदमान आणि निकोबारमधील बारातांग बेटावर पथक पाठविणार असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आज दिली. हे पथक भूगर्भातील हालचालींचा अभ्यास करेल.