esakal | तिसऱ्या लाटेसाठी सज्ज राहा : नरेंद्र मोदी
sakal

बोलून बातमी शोधा

Narendra Modi

तिसऱ्या लाटेसाठी सज्ज राहा : नरेंद्र मोदी

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - कोरोनाच्या (Corona) तिसऱ्या लाटेची (Third Wave) शक्यता पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) आज उच्चस्तरीय बैठकीमध्ये देशभरातील वैद्यकीय ऑक्सिजनच्या (Oxygen) उपलब्धतेचा आढावा घेतला. तसेच तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी सरकारी यंत्रणेला तयार राहण्याचे आदेश दिले. देशात १५०० अधिक पीएसए ऑक्सिजन प्रकल्प उभारले जात असून त्यावर वेगाने काम करण्याची आवश्यकता व्यक्त केली. (Get Ready for the Third Wave Narendra Modi)

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबद्दल चिंता व्यक्त केली होती. तसेच महाराष्ट्र आणि तमिळनाडूमधील परिस्थितीकडे लक्ष वेधताना या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी तयार राहण्याचे आवाहन मंत्र्यांना केले होते. तत्पूर्वी, मंत्रिमंडळ बैठकीमध्ये वैद्यकीय क्षेत्रातील पायाभूत सुविधा उभारणीसाठीच्या २३ हजार कोटी रुपयांच्या पॅकेजलाही मंजुरी देण्यात आली होती.

हेही वाचा: रेल्वे कर्मचारी आता दोन शिफ्ट्समध्ये करणार काम

मागील महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली असून बऱ्याच राज्यांमध्ये ऑक्सिजनची टंचाई आढळून आली. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी आज उच्चस्तरीय बैठक घेऊन वैद्यकीय ऑक्सिजन उपलब्धतेचा आढावा घेताना तिसरी लाट येण्याआधी जय्यत तयारी राखण्याचे आदेश दिल्याचे पंतप्रधान कार्यालयातर्फे सांगण्यात आले. पीएम केअर्स फंडद्वारे देण्यात आलेल्या पीएसएस ऑक्सिजन प्रकल्पांद्वारे चार लाखाहून अधिक खाटांना ऑक्सिजन पुरवठा करता येणार आहे. त्यामुळे या ऑक्सिजन प्रकल्पांवर वेगाने काम करावे जेणे करून लवकरात लवकर सर्व प्रकल्प सुरू होतील, ऑक्सिजन प्रकल्पांची देखरेख आणि रुग्णालय कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण यासाठी केंद्राच्या अधिकाऱ्यांनी राज्यांशी संपर्कात राहण्याचीही सूचना पंतप्रधानांनी केली. तसेच, सर्व जिल्ह्यांमध्ये प्रशिक्षित कर्मचारी असावेत, असेही अधिकाऱ्यांना पंतप्रधानांनी सांगितले.

loading image