जुन्यांना घालवून नामशेष करून टाका वयावरून भेद केल्याप्रकरणी आयबीएमवर खटला Get rid of the old ones | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुन्यांना घालवून नामशेष करून टाका
जुन्यांना घालवून नामशेष करून टाका

जुन्यांना घालवून नामशेष करून टाका

न्यूयॉर्क: जुन्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वयावरून भेद केल्याप्रकरणी इंटरनॅशनल बिझनेस मशिन्स अर्थात आयबीएम या अमेरिकेच्या जगप्रसिद्ध बहुराष्ट्रीय कंपनीवर खटला दाखल करण्यात आला आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील या अग्रगण्य कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या इमेलवरून एकविसाव्या शतकात जन्मलेल्या कर्मचाऱ्यांना जुन्यांच्या तुलनेत झुकते माप देण्यात आल्याचे उघड झाले.

हेही वाचा: Bushra Bibi : रहस्यमय आहे इम्रान खानची पत्नी; स्वतःला संबोधते...

न्यूयॉर्कच्या दक्षिण जिल्ह्यातील न्यायालयात खटल्याची सुनावणी सुरु आहे. काही जुन्या कर्मचाऱ्यांनीच न्यायालयात धाव घेतली आहे. सर्वोच्च पदावर असलेल्या अधिकाऱ्यांनी इमेलच्या माध्यमातून साधलेल्या संवादाचे तपशील न्यायालयात सादर करण्यात आले. आरोप ठेवता येईल इतक्या गंभीर स्वरूपाचा भेद कंपनीकडून झाल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

हा विषय न्यायप्रविष्ट असल्यामुळे पुराव्याचे तपशील पूर्णपणे जाहीर करण्यात आले नाहीत. कंपनीच्या अधिकाऱ्यांची ओळखही उघड करण्यात आली नसून ते कोणत्या कालावधीत ही चर्चा करीत होते याचाही तपशील नाही. याबाबत न्यायाधीशांनी मुळ कागदपत्रे उघड करण्याचा आदेश दिला आहे.

हेही वाचा: Bushra Bibi : रहस्यमय आहे इम्रान खानची पत्नी; स्वतःला संबोधते...

कंपनीकडून इन्कार

दरम्यान, आयबीएमच्या प्रवक्त्याने यासंदर्भात इन्कार केला. वयावरून पद्धतशीर भेद करण्याच्या धोरणाचा कंपनीने कधीही अवलंब केला नाही. वयामुळे नव्हे तर व्यवसायविषयक बदलत्या परिस्थितीमुळे कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले, असा दावा करण्यात आला. २०२० अमेरिकेतील कर्मचाऱ्यांचे सरासरी वय ४८ होते, ते २०१० इतकेच आहे, असेही नमूद करण्यात आले. संबंधित इमेलमधील भाषा कंपनीच्या कर्मचाऱ्यांबाबतच्या धोरणाशी सुसंगत नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

हेही वाचा: एअर इंडियाची धुरा इल्केर आयजींच्या खांद्यावर; वाचा नव्या CEO बद्दलच्या 10 गोष्टी

स्पर्धकांशी तुलना

नव्या शतकात जन्मलेल्या मुलांप्रमाणेच माता बनलेल्या महिला कर्मचाऱ्यांवरून वरिष्ठांनी ऊहापोह केला. स्पर्धक कंपन्यांच्या तुलनेत नव्या शतकात जन्मलेल्या कर्मचाऱ्यांचे प्रमाण बरेच कमी आहे असे निरीक्षण नोंदविण्यात आले. जुन्या कर्मचाऱ्यांना लेऑफ देण्यासारख्या उपायांचा अवलंब केल्यास ही संख्या वाढेल, मुलाबाळांची जबाबदारी असलेल्या महिला कर्मचाऱ्यांबाबत कंपनीचे धोरण बदललेच पाहिजे असा त्यांच्या चर्चेचा रोख होता.

एचआर अधिकाऱ्याची साक्ष

एका सुनावणीच्यावेळी मनुष्यबळ विकास (एचआर) विभागाच्या माजी उपाध्यक्षाची साक्ष झाली. गुणवान कर्मचारी भरती प्रक्रिया कंपनीची समस्या बनल्याचे त्याने नमूद केले. याबाबत एक गोष्टही करायचे ठरले. आयबीएम ही कंपनी जुनाट नसून कालानुरूप आकर्षक बदल केलेली आहे असे नव्या शतकात जन्मलेल्या मुलांना वाटले पाहिजे असा विचार पुढे आला.

जुने तर डायनोसॉरची पिल्ले

आयबीएमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इमेलच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांविषयी चर्चा केली. त्यात जुन्या कर्मचाऱ्यांना डायनोसॉरची पिल्ले (डायनोबेबीज) असे संबोधण्यात आले तसेच त्यांना (कंपनीमधून) नामशेष केले जावे असे आग्रही मत व्यक्त करण्यात आले.

लवादाच्या कलमांची ढाल

कंपनीविरुद्ध खटला भरलेल्या शेकडो कर्मचाऱ्यांची बाजू शॅन्नन लिसा-रिओर्डन मांडत आहेत. त्या कामगार क्षेत्रातील नामवंत वकील आहेत. त्यांनी सांगितले की, आयबीएमने वयावरून भेदाचा गंभीर प्रकार केला आहे. पुरावा मिळू नये म्हणून लवादाच्या कलमांची ढाल पुढे केली जात आहे. जनता तसेच कंपनीविरुद्ध खटला उभा करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या कर्मचाऱ्यांना दाद लागू द्यायची नाही हाच डाव आहे.

Web Title: Get Rid Of The Old Ones

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top