esakal | विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव दिलंत तर... -आशिष शेलार
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav-Thackeray-Ashish-Shelar

विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव दिलंत तर... -आशिष शेलार

sakal_logo
By
विराज भागवत
  • नवी मुंबई विमानतळाच्या नावावरून शिवसेना विरूद्ध स्थानिक, भूमिपुत्रांमध्ये वाद

मुंबई: नवी मुंबई येथे उभारण्यात येणाऱ्या विमानतळाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिलं तर त्याला आमचा विरोध असण्याचे कारण नाही. पण ते किती ठिकाणी असावं याचा विचार व्हायला हवा. दि. बा. पाटील यांचं नाव देण्यात येणार असेल तर भाजप त्याला विरोध करणार नाही, अशी स्पष्ट भूमिका भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी व्यक्त केली. दि. बा. पाटील यांचं कार्य मोठं आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी त्यांचे नाव द्यायचे आहे, त्या ठिकाणी आमचा विरोध नसेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. (Navi Mumbai International Airport Naming Debate Balasaheb Thackeray DB Patil BJP Ashish Shelar Warning)

हेही वाचा: "जिनके अपने घर शिशे के होते है..."; कोर्टाने परमबीरना सुनावलं

राज्याच्या राजकारणात भाजप विरूद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष सुरू आहे. दररोज आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. तशातच आता नव्या वादाची चर्चा रंगल्याचं चित्र आहे. नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्यायचं या मागणीवर शिवसेनेचे नेते आडून बसले आहेत. तर नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांचे नेते असलेल्या दि बा पाटील यांचे नाव या विमानतळाला दिले गेले पाहिजे या मुद्द्यासाठी नवी मुंबईतील विविध गावांतील नागरिक आणि स्थानिक आमदार आग्रही आहेत. याच मागणीसाठी १० जूनला नवी मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील विविध गावातील नागरिकांनी, ग्रामस्थांनी, आगरी व कोळी बांधवांनी मानवी साखळी आंदोलन केले. भूमिपुत्रांच्या या मागणीला भाजपच्या आशिष शेलार यांनी ठाण्यातील कार्यक्रमात बोलताना जाहीर पाठिंबा दिला.

हेही वाचा: विमानतळाला दि बा पाटलांचेच नाव द्या!; भूमिपुत्रांचं आंदोलन

शेलार यांनी इतरही विषयांवर भाष्य केले. "पावसाळा आला तर पाणी तुंबण्याची कारणं दिली जातात. जनतेला अपेक्षांचे गाजर देण्याचे काम केलं जातं. करून दाखवलं नावाचं गाजर शिवसेना वर्षानुवर्षे दाखवत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या कारभारामुळे जनतेला याचा त्रास भोगावा लागत आहे. मराठा आरक्षणाला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे. जे जनआंदोलन करतील त्यांनाही आमचा पाठिंबा आहे. राजे तर आमचेच आहेत. त्यामुळे जे लोक आंदोलन करत असतील त्यांच्यासोबत आम्ही नक्कीच असू", असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: "जसे मुंबईत बाळासाहेब ठाकरे, तसेच नवी मुंबईत दि. बा. पाटील"