व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चौकशीस तयार; ट्विटरच्या उत्तरावर पोलिस नाराज

Twitter
Twitter

लखनऊ : गाझीयाबादमधील वयस्कर मुस्लिम व्यक्तीची दाढी कापण्याचं प्रकरण सध्या चर्चेत आहे. या प्रकरणाच्या व्हिडीओसंदर्भात पोलिसांनी ट्विटर इंडियाचे डायरेक्टर मनीष माहेश्वरी यांना चौकशीसाठी लोनी पोलिस ठाण्यामध्ये बोलावलं आहे. पोलिसांच्या या पत्राच्या उत्तरादाखल ट्विटर इंडियाने म्हटलंय की, मनीष माहेश्वरी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपलब्ध राहू शकतील.

Twitter
दिल्लीत प्रशांत किशोर आणि शरद पवारांमध्ये महत्त्वाची बैठक

मात्र, पोलिसांनी ट्विटरच्या या उत्तरावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच त्यांना दुसरी नोटीस देखील पाठवली आहे. लोनी पोलिस ठाण्यात ट्विटरच्या विरोधात अनेक तक्रारी प्रलंबित आहेत. ट्विटरकडून असं देखील स्पष्ट करण्यात आलंय की, ते या प्रकरणी कसल्याही प्रकारची चर्चा करु इच्छित नाही. पोलिसांनी ट्विटरला आणखी एक नोटीस पाठवली आहे. या नोटीशीत पोलिसांनी त्या अकाउंटची माहिती मागितली आहे ज्या अकाउंटवरुन सर्वांत आधी हा व्हिडीओ पोस्ट झाला होता तसेच त्यानंतर तो व्हायरल देखील झाला होता.

या प्रकरणी गाझीयाबाद पोलिसांनी ट्विटरसहित 9 लोकांवर वेगवेगळ्या FIR दाखल केल्या आहेत. 'द वायर' ला देखील नोटीस पाठवण्यात आली आहे. बाकीच्यांना लवकरच नोटीस पाठवली जाईल.

Twitter
पंजाब : 'आप'चा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार शीख असेल - केजरीवाल

उत्तर प्रदेश पोलिसांनी वयस्कर मुस्लिम व्यक्तीला झालेल्या मारहाण प्रकरणी एक व्हिडीओ प्रसारित केल्याच्या संदर्भात ट्विटर, न्यूज पोर्टल 'द वायर' आणि आणखी सहा जणांच्या विरोधात खटला दाखल केला आहे. या व्हिडीओमध्ये या वृद्ध व्यक्तीला काही लोकांकडून मारहाण झालेली दिसून येत आहे तसेच त्यानंतर त्या वृद्ध व्यक्तीचं मनोगत देखील आहे. पोलिसांनी प्राथमिक तपासामध्ये या प्रकरणाला धार्मिक वळण असण्याला नकार दिला होता. गाझीयाबाद पोलिसांनी या प्रकरणी म्हटलंय की, वृद्ध व्यक्ती अब्दुल शमद सैफी यांनी आरोपींना विकलेल्या 'ताबीज'मुळे ते त्याच्याबद्दल नाराज होते. या प्रकरणी आणखी चार लोकांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत या प्रकरणी एकूण 9 जणांना अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com