

Suitcase Hides Dark Secret Tenant Couple Arrested For Murder
Esakal
घराचं भाडं मागण्यासाठी आलेल्या मालिकीणीची दाम्पत्यानं हत्या केल्याची धक्कादायक घटना गाझियाबादमध्ये घडलीय. नंदग्राम पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजनगर एक्सटेंशनमधील उच्चभ्रू सोसायटीत घडलेल्या घटनेनं खळबळ उडालीय. गेल्या पाच सहा महिन्यांपासून भाडेकरू दाम्पत्यानं भाडं दिलं नव्हतं. ते मागण्यासाठी महिला पोहोचली होती. तिची गळा दाबून हत्या करत मृतदेह सूटकेसमध्ये ठेवून बेडखाली लपवला होता.