esakal | तुमचं नाव बदलेल पण हैदराबादचं नाही, ओवेसींचा योगी आदित्यनाथ यांच्यावर पलटवार
sakal

बोलून बातमी शोधा

asaduddin owaisi yogi adityanath.jpg

आम्ही फैजाबादचं अयोध्या केलं. अलाहाबादचं प्रयागराज केलं. मग येथील वास्तवात असलेलं भाग्यनगर हे नाव का बदलता येणार नाही.

तुमचं नाव बदलेल पण हैदराबादचं नाही, ओवेसींचा योगी आदित्यनाथ यांच्यावर पलटवार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हैदराबाद- हैदराबाद महापालिका निवडणुकीतील प्रचारात राजकीय नेत्यांच्या शाब्दिक युद्धामुळे रंगत आल्याचे दिसत आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी एमआयएमच्या ओवेसी बंधूंचा बालेकिल्ला असलेल्या हैदराबादचे नाव बदलून भाग्य नगर करण्याचे आश्वासन दिले. त्याला असदुद्दीन ओवेसी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तुमचं नाव बदलेल पण हैदराबादच नाव बदलणार नाही, अशा शब्दांत त्यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर पलटवार केला आहे. 

ओवेसी हे एका प्रचारसभेत बोलत होते. तत्पूर्वी, योगी आदित्यनाथ यांनी आपल्या एका प्रचारसभेत म्हटले होते की, हैदराबादचं भाग्यनगर असं नाव बदलता येऊ शकतं का असं काही लोक मला विचारत होते. मी त्यांना म्हणालो की, आम्ही फैजाबादचं अयोध्या केलं. अलाहाबादचं प्रयागराज केलं. मग येथील वास्तवात असलेलं भाग्यनगर हे नाव का बदलता येणार नाही. भाग्यनगरचा अर्थ विकासाचे प्रतीक असा आहे. 

हेही वाचा- शत्रूंना त्यांच्याच देशात जाऊन संपवणारी इस्त्राईलची 'मोसाद'; इराणी अणु शास्त्रज्ञाच्या हत्येने पुन्हा चर्चेत

आदित्यनाथ यांच्यावर पलटवार करताना ओवेसी एका सभेत म्हणाले की, हैदराबादचं नाव बदलणार, प्रत्येक ठिकाणाचे नाव बदलणार. लक्षात ठेवा, तुमचं नाव बदलेल पण हैदराबादचं नाव नाही बदलणार. ते पुढे म्हणाले की, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आले आणि नाव बदलून देतो, असे म्हणाले. अरे भाईसाब, तुम्ही काय याचा ठेका घेतला आहे का ? त्यांना विचारा ताजमहल कोण बांधला ? ते म्हणतील, मुघल बादशाहने नव्हे कोणीतरी दुसऱ्याने बांधला होता. आता कुतुबमिनार आणि चारमिनार हेही कोणी दुसऱ्याने बांधला होता, असे म्हणतील. 

हेही वाचा- नक्षलवाद्यांच्या IED स्फोटात सीआरपीएफच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू, सात जण जखमी

कोणी म्हणतं की, किल्ल्यावर आपला झेंडा लावणार. पण किल्ला आमचा आहे. तो किल्ला आमचा आहे, आम्ही तिथे तिरंगा फडकवणार आहोत. यापेक्षा दुसरा कोणता झेंडा असू शकतो. तुमचा झेंडा लागणार नाही की तुमचा डंडा (काठी) चालणार नाही. इथे मशीद होती आणि राहणार, असे त्यांनी ठामपणे सांगितले. 

हेही वाचा- भाजप सत्तेत आल्यास हैदराबादचं नाव बदलू; योगी आदित्यनाथ गरजले

दरम्यान, भाजपचे स्टार प्रचारक मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी हैदराबादमधील मलकजगिरी आणि शालीबंदा लाल दरवाजा येथे प्रचारसभा घेतली होती. त्यापूर्वी त्यांनी रोड शो केला. योगी आदित्यनाथ यांना ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. प्रचारसभेत आदित्यनाथ यांनी टीआरएस आणि एमआयएमवर भ्रष्टाचारासह अनेक गंभीर आरोप केले. 
 

loading image
go to top