मुख्यमंत्री निवासस्थानात ‘भूता’चे वास्तव्य; काय आहे प्रकरण वाचा...

पीटीआय
Saturday, 4 January 2020

गेली काही वर्षे राजकीय वनवासात असलेले लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या पत्नी राबडीदेवी यांनी आज ‘मुख्यमंत्री निवासस्थानातील भूता’ची गोष्ट सांगत राज्यातील जनतेचे चांगलेच मनोरंजन केले. या दोघांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांना अप्रत्यक्षपणे ‘भूता’ची उपमा देत विनोदी मार्गाने त्यांच्यावर टीका केली.

पाटणा - गेली काही वर्षे राजकीय वनवासात असलेले लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या पत्नी राबडीदेवी यांनी आज ‘मुख्यमंत्री निवासस्थानातील भूता’ची गोष्ट सांगत राज्यातील जनतेचे चांगलेच मनोरंजन केले. या दोघांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांना अप्रत्यक्षपणे ‘भूता’ची उपमा देत विनोदी मार्गाने त्यांच्यावर टीका केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नितीशकुमार यांनी काल (ता. २) लालू आणि राबडींबरोबरील मैत्रीचे आणि विरोधाचे किस्से जाहीरपणे सांगितले होते. यामुळे सध्या चारा गैरव्यवहारप्रकरणी रांचीतील तुरुंगात शिक्षा भोगत असलेले लालू आणि सूनेचा छळ केल्याचा आरोप असलेल्या राबडीदेवी यांना नितीशकुमार यांच्यावर टीका करण्याची संधी मिळाली. या दोघांनी ट्विटरच्या माध्यमातून वाग्बाण सोडले. १९९० ला बिहारचे मुख्यमंत्री झालेल्या लालूंना त्यांच्यावरील आरोपांनंतर १९९७ ला पद सोडावे लागले होते. ही मुख्यमंत्रिपदाची सूत्रे राबडीदेवींनी २००५ पर्यंत सांभाळली. यादव कुटुंबाची १५ वर्षांची सत्ता नितीशकुमारांनी संपुष्टात आणली. 

पंतप्रधान नरेंद्र  मोदींनी काँग्रेसला  'हा'  सल्ला दिला

हाच धागा राबडीदेवींनी टोमणे मारताना पकडला. ‘गरिबांचे तारणहार २००५ ला मुख्यमंत्री निवासस्थानातून गेल्यावर हे घर एका भुताने झपाटले आहे. मला खात्री आहे, १५ वर्षांनंतरही नितीशजी ज्या वेळी आरशात पहात असतील, त्यांना भूत दिसत असेल,’ असे राबडीदेवींनी ट्विटरवर म्हटले आहे. यावर लालूंनीही विनोद करण्याची संधी सोडली नाही. ‘लोकांना ज्या दुष्ट शक्तींनी झपाटले आहे, तिला दूर करण्यासाठी बिहारची जनता मांत्रिकालाही पैसे देण्यास तयार होईल,’ असे लालूंनी म्हटले आहे. 

माझ्या बायकोला न्या अऩ् 50 कोटी मिळवा...

लालूंनी नितीशकुमार यांचे थेटपणे नाव घेणे टाळले. भाजपचे नेते सुशीलकुमार मोदी यांनी मात्र यादव दांपत्यावर अंधश्रद्धा पसरवित असल्याचा आरोप केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ghosts residence in the CMs residence in Bihar