Rahul Gandhi: राहुल गांधी उद्योपगपतींना भेटण्यासाठी परदेशात जातात; पूर्वाश्रमीच्या काँग्रेस नेत्याचा दावा

Rahul Gandhi News
Rahul Gandhi Newsesakal

नवी दिल्लीः एकेकाळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेले गुलाम नबी आझाद हे मागील काही दिवसांपासून भाजपला सॉफ्ट कॉर्नर देत असल्याचं समोर आलेलं आहे. आता तर त्यांनी थेट राहुल गांधी यांच्यावर स्फोटक आरोप केले आहेत.

राहुल गांधी उद्योगपींना भेटण्यासाठी परदेशात जातात, असं म्हणत त्यांनी आता नव्या वादाला तोंड फोडलंय. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदाणी यांच्यातल्या संबंधांवरुन २० हजार कोटींचे आरोप केले होते. अदाणींच्या कंपनीमध्ये बेनामी असलेले २० हजार कोटी रुपये कुणाचे? असा प्रश्न राहुल गांधींनी उपस्थित करुन खळबळ उडवून दिली होती.

देशात मोदी-अदाणी संबंधांवर चर्चा आणि आरोप-प्रत्यारोप होत असतांना काँग्रेसचे पूर्वाश्रमीचे नेते गुलाम नबी आझाद यांनी राहुल गांधींवर गंभीर आरोप केले आहेत. राहुल यांचेच अनेक उद्योगपतींशी संबंध आहेत. कुटुंबासह ते त्यांना भेटण्यासाठी परदेशात जातात. या त्यांच्या आरोपानंतर भाजप आक्रमक झालेलं असून राहुल गांधींनी त्यांच्याशी संबंधित उद्योगपतींची नावे जाहीर करावीत, अशी मागणी केली आहे.

एका मुलाखतीमध्ये बोलतांना आझाद म्हणाले की, राहुल गांधींचे अनडिझायरेबल उद्योगपतींशी संबंध आहेत. याची मी दहा उदाहरणं देऊ शकतो. राहुल गांधी हे कुटुंबियांसह त्यांना भेटण्यासाठी परदेशात जातात, असा दावा त्यांनी केलाय.

यानंतर भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी एक ट्विट केलं आहे. ते म्हणाले की गुलाम नबी आझाद यांनी गंभीर आरोप केले आहेत. राहुल जेव्हा परदेशी जातात तेव्हा अवांच्छित उद्योगपतींना भेटतात आणि त्यांचे काही उद्योगपतींच्या घराण्याशी संबंध आहेत. त्यामुळे ते नेमके कुणाला भेटतात, हे जाणून घेण्यासाठी आम्ही इच्छूक आहोत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com