Paan City in UP: मुखात टाकताच विरघळणारा सुवासिक विडा! हे आहे 'पानांचे शहर'; मिळालाय जीआय टॅग!

GI tag awarded to India’s famous paan producing city latest news: उत्तर प्रदेशातील महोबाच्या मखमली, सुवासिक ‘देशावरी पानाला’ जीआय टॅग; शतकानुशतकांची परंपरा जपणाऱ्या ‘पान नगरी’ची देशभरात आणि परदेशातही वाढती मागणी
India’s Aromatic Betel Leaf Industry Gets GI Tag for Unique “Paan City”

India’s Aromatic Betel Leaf Industry Gets GI Tag for Unique “Paan City”

esakal

Updated on

भारतात जेवण झाल्यानंतर किंवा एखाद्या शुभकार्यात पाहुण्यांना मानाचा विडा म्हणजेच 'पान' देण्याची परंपरा शतकानुशतके जुनी आहे. पान खाणाऱ्या शौकिनांच्या मते, यामुळे केवळ तोंडाला चव येत नाही तर पचनक्रियाही सुधारते. संपूर्ण भारतात विविध ठिकाणी पानांची शेती केली जाते, परंतु उत्तर प्रदेशातील एका विशिष्ट जिल्ह्याला देशाची 'पान नगरी' किंवा 'पानांचे शहर' (Paan City) म्हणून ओळखले जाते. बुंदेलखंड भागातील महोबा (Mahoba) हा जिल्हा आपल्या अद्भूत आणि जगप्रसिद्ध 'देशावरी पाना'साठी (Desawari Paan) ओळखला जातो. महोबाच्या या खास पानाला भारत सरकारकडून मानाचा 'जीआय टॅग' (GI Tag) देखील मिळालेला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com