जयललितांना श्रद्धांजली; चाहत्याने केली 68 किलोची इडली

वृत्तसंस्था
बुधवार, 21 डिसेंबर 2016

चेन्नई (तमिळनाडू) : तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या एका चाहत्याने चेन्नईतील मरिना बीचवर जयललितांच्या चेहऱ्याचे चित्र साकारलेली तब्बल 68 किलोची इडली तयार करून अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिली आहे.

चेन्नई (तमिळनाडू) : तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या एका चाहत्याने चेन्नईतील मरिना बीचवर जयललितांच्या चेहऱ्याचे चित्र साकारलेली तब्बल 68 किलोची इडली तयार करून अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिली आहे.

चेन्नईतील अपोलो रुग्णालयात दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ उपचार घेत असताना पाच डिसेंबर रोजी जयललिता यांचे निधन झाले. निधनानंतर चाहते वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या लाडक्‍या नेत्याला श्रद्धांजली वाहत आहेत. त्यामध्ये काही जणांनी डोक्‍यावरील केस कापले तर काही जणांनी शरीरावर टॅट्टु गोंदवून श्रद्धांजली अर्पण केली. मंगळवारी एका चाहत्याने तब्बल 68 किलोची इडली तयार केली. या महाकाय इडलीचे चित्र सोशल मिडियावर व्हायरल झाले. या चित्रावर ट्‌विटरवर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. त्यांच्या निधनाच्या धक्‍क्‍याने 400 पेक्षा अधिक जणांचा मृत्यु झाल्याचे एआयडीएमकेने जाहीर केले होते. तसेच मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी तीन लाख रुपये नुकसानभरपाईही जाहीर केली.

दरम्यान, तमिळनाडूचे मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी जयललिता यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा आणि संसदेच्या परिसरात त्यांचा पुतळा उभारण्यात अशा मागण्या केल्या.

Web Title: a Giant Idli in Remember of Jayalalithaa