
गुजरातच्या गिर नॅशनल पार्कमध्ये दोन सिंहाची अशी मैत्री होती की त्यांना जय आणि वीरू म्हणून ओळखलं जात होतं. १९७५मध्ये आलेला ब्लॉकबस्टर चित्रपट शोलेतील जय वीरूसारखेच हे दोन्ही सिंह एकमेकांशिवाय अपूर्ण होते. गेल्या अनेक वर्षांपासून गिर अभयारण्यात ते सोबतच फिरत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदा केलेल्या गिर अभयारण्याच्या दौऱ्यात या जोडीचं कौतुक केलं होतं. पण सिंहाच्या या जोडीचा मृत्यू झाला आहे.