अल्पवयीन मुलीचे कपडे उतरवल्याचा व्हिडिओ व्हायरल

वृत्तसंस्था
मंगळवार, 1 मे 2018

जहानाबाद (बिहार): बिहारमधील जहानाबाद जिल्ह्यात आठ नराधम तरुणांचे टोळके एका अल्पवयीन मुलीची छेड काढत तिचे कपडे उतरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा संतापजनक प्रकार करणाऱ्या आरोपींवर पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधात्मक कायद्यान्वये (पॉस्को) गुन्हा नोंदवला असून एसआयटीने दोन संशयितांनाही ताब्यात घेतले आहे.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओत काही तरुण एका अल्पवयीन मुलीची छेड काढत तिचे कपडे उतरवण्याचा प्रय्तन करत असल्याचे दिसत आहेत. त्याचवेळी काही जण ही घटना मोबाईलमध्ये चित्रित करताना दिसत आहेत. माझे कपडे उतरवू नका, अशी विनवणी पीडित मुलगी करत असल्याचे दिसत आहे. मात्र, ते तरुण तिला शिवीगाळही करत तिचे कपडे उतरवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. या वेळी ती मुलगी सुटका करून घेण्यासाठी असहायपणे त्यांना विरोध करत असल्याचे दिसते. हा व्हिडिओ घेणाऱ्यांसह कोणीही तिच्या मदतीला पुढे आल्याचे दिसलेले नाही. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर जहानाबाद पोलिसांनीच तक्रार दाखल करून घेतली आहे. ज्या मोबाईलवरून हा प्रकार चित्रित करण्यात आला तो मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला असून, या व्हिडिओच्या आधारे पोलिस आणि एसआयटी आरोपींचा शोध घेत आहेत.

व्हिडिओच्या या प्रकाराबाबत आरोपींच्या शोधासाठी वरिष्ठ पोलिस अधिकारी नय्यर हुसैन खान यांनी एक विशेष पथक स्थापन केले आहे.

Web Title: Girl Attacked By 8 In Bihar, Clothes Ripped Off In Video