युवती बनली आई; 12 वर्षाच्या मुलावर गुन्हा दाखल

वृत्तसंस्था
सोमवार, 7 नोव्हेंबर 2016

कोची- एका अठरा वर्षाच्या युवतीने येथील खासगी रुग्णालयात बाळाला जन्म दिला असून, याप्रकरणी 12 वर्षांच्या मुलावर कालामसरी पोलिस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोची- एका अठरा वर्षाच्या युवतीने येथील खासगी रुग्णालयात बाळाला जन्म दिला असून, याप्रकरणी 12 वर्षांच्या मुलावर कालामसरी पोलिस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका युवतीने खासगी रुग्णालयात बाळाला जन्म दिल्याची माहिती उघड झाली होती. या प्रकरणी युवतीला गर्भवती केल्याबद्दल 12 वर्षाच्या मुलावर व या घटनेबाबत माहिती न दिल्याबद्दल रुग्णालयावर गुन्हा दाखल केला आहे. संबंधीत युवती अल्पवयीन आहे. अठरा वर्षे पुर्ण होण्यास अद्याप दोन महिने बाकी आहेत.
 
दरम्यान, युवतीच्या आजी-आजोबांनी बाळाचं संगोपन करण्यास असमर्थता दर्शवत बाळाला बाल कल्याण आयोगाकडे सोपवले आहे.

Web Title: Girl delivers in hospital, 12-year-old booked

टॅग्स