
उत्तर प्रदेशातील मैनपुरीमधूनही एक प्रकार समोर आला आहे. एका किशोरवयीन मुलीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला तेव्हा संपूर्ण गुपित उघड झाले. या किशोरीचे तिच्या मामाच्या मुलाशी प्रेमसंबंध होते. मुलीची आजी फर्रुखाबाद जिल्ह्यातील मोहम्मदाबाद येथे राहत होती. दोन वर्षांपूर्वी जेव्हा तिचा मृत्यू झाला तेव्हा ती किशोरी तिच्या मामाच्या घरी गेली.