आपल्याला पैशांची गरज आहे; तू बलात्कार विसर! : पालकांचा धक्कादायक सल्ला

वृत्तसंस्था
मंगळवार, 17 एप्रिल 2018

''बलात्काराची तक्रार मागे घेण्यास मी तयार नाही. पण माझ्या पालकांकडून तक्रार मागे घेण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला जात आहे. माझे पालक मला ब्लॅकमेल करत आहेत. आपण गरीब असून, आपल्याला पैशांची गरज असल्याचे सांगत आपला जबाब मागे घेण्यास त्यांच्याकडून मला सांगण्यात येत आहे.''

- पीडित तरूणी

नवी दिल्ली : देशभरात बलात्कारांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. बलात्कार, विनयभंग यांसारखी प्रकरणे दिवसेंदिवस उघडकीस येत आहेत. मात्र, राजधानी दिल्लीत बलात्काराची तक्रार मागे घेण्यासाठी पीडितेच्या पालकांनाच बलात्कार करणाऱ्या आरोपीने पैशांची 'ऑफर' दिली आणि पीडितेला तक्रार मागे घेण्यासाठी तिच्याच पालकांकडून दबाव आणला जात आहे. 

ऑगस्ट, 2007 मध्ये दिल्ली येथील एका 18 वर्षीय तरुणीवर दोघा नराधमांनी बलात्कार केला होता. पोलिसांनी यातील आरोपींना अटक केली होती. त्यानंतर यातील एका आरोपीला न्यायालयाकडून जामीन देण्यात आला होता. या आरोपीने पीडितेच्या पालकांना 20 लाखांची ऑफर दिली होती. या 20 लाखांच्या बदल्यात बलात्काराची तक्रार मागे घेण्यास त्या आरोपीने पीडितेच्या पालकांना सांगितले होते. त्यानंतर पीडित तरुणीच्या पालकांनी दिलेली ऑफर स्वीकारत पीडित तरूणीला बलात्काराची तक्रार मागे घेण्यास सांगितले.

''मला या नराधमांनी एका अज्ञातस्थळी नेले होते. त्यानंतर त्यांनी माझ्यावर बलात्कार केला'', असा जबाब पीडित तरूणीने पोलिसांना दिला होता. 

''बलात्काराची तक्रार मागे घेण्यास मी तयार नाही. पण माझ्या पालकांकडून तक्रार मागे घेण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला जात आहे. माझे पालक मला ब्लॅकमेल करत आहेत. आपण गरीब असून, आपल्याला पैशांची गरज असल्याचे सांगत आपला जबाब मागे घेण्यास त्यांच्याकडून मला सांगण्यात येत आहे'', असे पीडित तरूणीने सांगितले.  

Web Title: Girl gets parents booked for settling rape case 20 lakh bribe Crime News