esakal | Video: युवती स्विमिंगदरम्यान गेली स्टंट करायला अन्...
sakal

बोलून बातमी शोधा

girl stant befor into pool see what happend viral video

सोशल मीडियावरील व्हिडिओच्या माध्यमातून अनेकजण एका रात्रीत चर्चेत येतात. पण, काही जण प्रसिद्धी मिळविण्याच्या नादात स्टंट करायला जातात आणि फजिती होते. असाच एका युवतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Video: युवती स्विमिंगदरम्यान गेली स्टंट करायला अन्...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : सोशल मीडियावरील व्हिडिओच्या माध्यमातून अनेकजण एका रात्रीत चर्चेत येतात. पण, काही जण प्रसिद्धी मिळविण्याच्या नादात स्टंट करायला जातात आणि फजिती होते. असाच एका युवतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Video: बिबट्या शिकार घेऊन किती वेळा आदळला पाहाच...

युवतीला तिचे मित्र-मैत्रिणी स्टंट करू नको म्हणून सांगत होत्या. पण, तिने कोणाचेही न ऐकता स्टंट करायला गेली आणि फसली. पाण्यात उडी घेतल्यानंतर तिला पाण्यातच बसून राहावे लागले. 10 सेकंदाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, युवती स्विमिंग पूलमध्ये स्टंट करत गोलांटी उडी मारते आणि त्यानंतर तिने डोक्यावर घातलेला विक खाली पडतो आणि तरुणी स्विमिंग पूलमध्ये. हा संपूर्ण प्रकार पाहून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकतो. युवतीला आपली फजिती झाल्याचे लक्षात येते. यामुळे ती शरमेने पूलमध्ये बसून राहते. दरम्यान, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. शिवाय, व्हिडिओ पाहून अनेकांना हसू आवरेनासे झाले.

loading image