esakal | Video: बिबट्या शिकार घेऊन किती वेळा आदळला पाहाच...
sakal

बोलून बातमी शोधा

snow leopard fall mountain happens rare footage video viral

बिबट्याने शिकार केल्यानंतर दरीत कोसळला. कितीतरी ठिकाणी आदळताना दिसत असून, शेवटपर्यंत त्याने शिकार सोडली नाही. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आयएफएस अधिकारी परवीन कासवान यांनी व्हिडिओ ट्विट केला आहे.

Video: बिबट्या शिकार घेऊन किती वेळा आदळला पाहाच...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्लीः बिबट्याने शिकार केल्यानंतर दरीत कोसळला. कितीतरी ठिकाणी आदळताना दिसत असून, शेवटपर्यंत त्याने शिकार सोडली नाही. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आयएफएस अधिकारी परवीन कासवान यांनी व्हिडिओ ट्विट केला आहे.

रस्त्यावरील कुत्रा बनला अधिकृत सेल्समन!

परवीन कासवान व्हिडिओ ट्विट करतानाच शीर्षक लिहिले की, 'हिमबिबट्याला डोंगरातील भूत म्हटले जाते. त्याच्यात काय तादक आहे, हे पाहायला मिळते हा व्हिडीओ मारटीन डोहरन यांनी मंगोलियातील गोबीमध्ये शूट केला आहे'. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, बर्फाच्या डोंगरात एक हिमबिबट्या काही शिकारीच्या मागे लागतो. शिकारी मागे धावत असताना अचानक समोर एक दरी येते आणि बिबट्या शिकारीला घेऊन दरी कोसळतो. शिकार आणि बिबट्या अनेक ठिकाणी आदळतात. पण, बिबट्याला काही होत नाही. शिवाय, शिकारही सोडत नाही. यावरून बिबट्याची ताकद आणि चलाखी दिसून येते.'

दरम्यान, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सनी प्रथमच असा व्हिडिओ पाहात असल्याचे म्हटले आहे. शिवाय, व्हिडिओ पाहून अनेकजण थक्क झाले आहेत.

Video: मंदिरात अर्पण केलेल्या दूधाचा 'असा' सदुपयोग

loading image