
गुजरातमधील अहमदाबादमध्ये एक भयानक घटना समोर आली आहे. नवरंगपुरा येथील एका शाळेच्या चौथ्या मजल्यावरून एका १६ वर्षीय विद्यार्थिनीने उडी मारली. गंभीर जखमी झालेल्या मुलीला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. जिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मुलगी दहावीत शिकत होती. मुलीसोबत शिकणाऱ्या तिच्या मैत्रिणींनी सांगितले की ती पूर्णपणे बरी होती. चौथ्या मजल्यावरून उडी मारल्याने मुलीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.