
प्रेम ही एक सुंदर भावना आहे. मात्र, नातं तुटल्यानंतर कधी-कधी एकमेकांवर खर्च केल्या जाणाऱ्या पैशांमुळे हत्याही होतात, अशीच एक घटना झारखंडची राजधानी रांचीमधून समोर आली आहे. रांचीमध्ये रिलेशनशिप तुटल्यानंतर एक्स प्रियकराला आपल्या प्रेयसीकडे तिच्यासाठी खर्च केलेले पैसे मागणे इतके महागात पडले की त्याला आपला जीव गमवावा लागला.