
सायबर सिटी गुरुग्राममध्ये, एका ४० वर्षीय विवाहित पुरूषाची त्याच्या लिव्ह-इन पार्टनरने चाकूने वार करून हत्या केली. मृताचे नाव हरीश असे आहे. तो बलियावास फेज-१ गावचा रहिवासी आहे. तो एका कंपनीत नोकरी करत होता आणि दोन मुलींचा बाप होता. हत्येची माहिती मिळताच डीएलएफ फेज-३ पोलीस ठाण्याने कारवाई केली आणि आरोपी महिलेला अटक केली.