तिच्याशिवाय मी राहू शकत नाही; फेसबुक लाईव्ह करून आत्महत्या

वृत्तसंस्था
सोमवार, 22 जुलै 2019

रायभा गावातील मंदिरात शनिवारी (20 जुलै) झालेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. श्याम सिकरवार उर्फ राज असे या 22 वर्षीय युवकाचे नाव आहे. त्याने 4 पानांची ‘सुसाईड नोट’ लिहिली आहे. यात त्याने आत्महत्या करत असल्याने आपल्या कुटुंबीयांची माफी मागितली. तसेच अवयवदानाची इच्छा व्यक्त केली.

लखनौ : प्रेयसीचे दुसऱ्यासोबत लग्न ठरल्याच्या नैराश्यातून त्याने चक्क मंदिरातूनच आत्महत्या करत असल्याचे फेसबुक लाईव्ह केले. उत्तर प्रदेशमधील आग्रा जिल्ह्यातील रायभा गावात ही घटना घडली आहे.

रायभा गावातील मंदिरात शनिवारी (20 जुलै) झालेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. श्याम सिकरवार उर्फ राज असे या 22 वर्षीय युवकाचे नाव आहे. त्याने 4 पानांची ‘सुसाईड नोट’ लिहिली आहे. यात त्याने आत्महत्या करत असल्याने आपल्या कुटुंबीयांची माफी मागितली. तसेच अवयवदानाची इच्छा व्यक्त केली.

एका मंदिरात जाऊन फेसबुक लाईव्ह देखील त्याने केले. विशेष म्हणजे या तरुणाने आपण आत्महत्या करत असल्याची माहिती आपल्या मित्रांना आणि कुटुंबीयांनाही दिली होती. तरुण आत्महत्या करत असताना त्याचे मित्र फेसबुकवर हा सर्व प्रकार पाहत होते. यानंतर स्थानिक लोकांनी मंदिरात पाहिले असता त्यांना त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत दिसला. हा युवक मागील काही काळापासून नैराश्यात होता. याचमुळे त्याला आपली नोकरी देखील गमवावी लागली होती. त्याने आत्महत्या करताना लिहिलेल्या चिट्ठीत लिहिले आहे, की मला तिची खूप आठवण येत आहे. तिच्याशिवाय मी राहू शकत नाही. तिचे दुसरे कुणाशी लग्न होत आहे हे मला अजिबात सहन होत नाही. तिला गमावण्याच्या विचाराने मी प्रचंड तणावात आहे. त्यामुळे माझी नोकरीही गेली. त्याने आपल्या कुटुंबीयांना मृत्यूनंतर मृतदेहाचे काही फोटो आपल्या फेसबुकवर टाकण्यास सांगितले. मात्र, कुटुंबीयांनी त्याचे फेसबुक अकाऊंट बंद केले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Girlfriend Marrying Another Man Youth Live streams Suicide on Facebook in Agra